Chandrkant Khaire son Rushikesh khaire Demand of two lakhs for government transfer? audio clip viral: औरंगाबाद : ठाकरे सरकारमध्ये शासकीय बदल्यांसाठी पैशांचे व्यवहार होत असल्याचा आरोप तत्कालिन विरोधी पक्षनेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. दरम्यान, आता शिवसेना (UBT) चे औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा मुलगा ऋषिकेश खैरे यांनी शासकीय बदलीसाठी दोन लाख रुपयांचा व्यवहार केल्याचा दावा एका ऑडियो क्लिपमध्ये करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
ही ऑडियो क्लिप सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. इतकंच नाही तर ही ऑडियो क्लिप आपलीच असल्याचं ऋषिकेश खैरे यांनीही मान्य केलं आहे. मात्र व्यवहार वेगळा आणि बदलीचा विषय वेगळा आहे असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. (Chandrkant Khaire son rushikesh khaire Demand of two lakhs for government transfer? audio clip viral)
व्हायरल ऑडियो क्लिपमध्ये वन खात्याच्या बदलीसाठी एका व्यक्तीकडून ऋषिकेश खैरे यांनी ठाकरे सरकार सत्तेत असताना २ लाख रुपये घेतल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र बदलीचे काम झालं नसल्यानं, सदरील व्यक्ती पैसे परत मागत आहे. पण पैसे देण्यासाठी ऋषिकेश टाळाटाळ करत असल्याचं संभाषणात ऐकू येत आहे. इतकंच नाही तर संबंधित व्यक्तीनं ऋषिकेश खैरे यांच्याकडून काम झालं नसल्यानं दुसरीकडेही पैसे देऊन व्यवहार केल्याचं या ऑडियो क्लिप मधून समोर येत आहे.
Bageshwar Baba विरोधात संताप! मनसे आक्रमक, अंधारेंचा फडणवीसांवर हल्ला
या क्लिपवर ऋषिकेश खैरे काय म्हणाले?
ही क्लिप आपलीच असल्याच ऋषिकेश खैरे यांनी मान्य केलं आहे. मात्र बदलीचा विषय वेगळा आणि पैशांचा व्यवहार वेगळा असल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. आमच्या मित्रांमध्ये पैशांचे व्यवहार चालू असतात. ठाकरे सरकार चालू असताना एका मित्रामार्फत संबंधित व्यक्ती माझ्याकडे आले होते.
BJP: ‘मरेपर्यंत भाजपसोबत जाणार नाही..’ नेमकी कोणी केली भीष्मप्रतिज्ञा?
ठाकरे सरकार आहे, तर काम करुन द्या, अशी विनंती त्यांनी केली. मित्रांच्या मार्फत आल्याने करुन देतो असा शब्द दिला होता. पण त्यांचं काम झालं नव्हतं. क्लिपमध्ये जो पैशांचा व्यवहार आहे तो आमच्या मित्रांमधील व्यवहार आहे. बदलीचा आणि या व्यवहाराचा काहीही संबंध नाही. बोलण्याचा विपर्यास झाल्याचही यावेळी ऋषिकेश खैरे म्हणाले.
ADVERTISEMENT