मुंबई: राज्यातील कोरोनाची (Corona) दुसरी लाट ही अत्यंक भयानक असल्याचं मागील काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. यावेळी रुग्णांची आणि मृतांची संख्या ही झपाट्याने वाढत आहे. अशावेळी सरकार कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी बरेच प्रयत्न करत आहे. त्यासाठी अनेक निर्णय देखील घेत आहे. याचदरम्यान परीक्षांबाबत आणखी एक महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
ADVERTISEMENT
राज्यात कठोर लॉकडाऊन असल्याने संचारबंदी करण्यात आली आहे. अशावेळी आता राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. यावेळी उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे की, उद्यापासून राज्यातील 13 अकृषी विद्यापीठांमधील कोणत्याही वर्षाच्या परीक्षा या ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जातील.
Covid 19 चा प्रादुर्भाव वाढल्याने SSC च्या परीक्षा रद्द-वर्षा गायकवाड
पाहा नेमकं काय म्हणाले उदय सामंत:
‘कुणीही परीक्षेपासून वंचित राहणार नाही. कोणत्या विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता विद्यापीठानं घेतली पाहिजे. विद्यापीठांना जी काही यंत्रणा लागेल ती देखील प्रशासनाने पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यापीठांच्या सगळ्याच परीक्षा त्यात एफ वाय, एस वाय, टी वाय सगळ्याच परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतल्या गेल्या पाहिजेत असा निर्णय झाला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की, उच्च शिक्षण आणि त्यासंबंधी ज्या गोष्टी आहेत त्यांना जर अत्यावश्यक सेवांमध्ये टाकण्यात आलं तर निकाल जाहीर करणं वैगरे गोष्टी सोप्या होतील. त्यामुळे त्यासंबंधी मुख्यमंत्र्यांना विनंती करण्यात येणार आहे.’ असं उदय सामंत यावेळी म्हणाले.
दरम्यान, या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणी येणार असतील तर त्याची पूर्तता करण्यात यावी असेही आदेश उदय सामंत यांनी विद्यापीठांच्या कुलगुरुंना दिल आहेत. या निर्णयामुळे आता 13 विद्यापीठात उद्यापासून ऑफलाइन परीक्षा होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. म्हणजेच आता यापुढे ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे.
ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! MPSC आणि MBBS च्या परीक्षा पुढे ढकलल्या
विद्यापीठांसमोर कोणती आव्हानं असणार?
ऑनलाइन परीक्षा घेताना राज्यातील सर्वदूर शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा विद्यापीठांना विचार करावा लागणार आहे. आतापर्यंत बहुतांशी परीक्षा पद्धत ही ऑफलाइनच होती. त्यामुळे आता जर सरसकट ऑनलाइन परीक्षा घ्यायची असल्याने त्या दृष्टीने पायाभूत सुविधांची उभारणी करावी लागणार आहे. याशिवाय परीक्षार्थींना ऑनलाइन म्हणजे नेमकी कशा स्वरुपात परीक्षा घेतली जाईल हे देखील समजावून सांगावं लागणार आहे. विद्यार्थ्यांचा कुठेही घोळ होऊ नये याची आता संपूर्ण जबाबदारी उच्च शिक्षण विभाग आणि विद्यापीठांची असणार आहे.
ADVERTISEMENT