Exclusive : विनायक मेटे ज्या SUV ने प्रवास करत होते त्यावर ४७ चलन, ४७ हजारांचा दंड बाकी

मुंबई तक

• 12:37 PM • 16 Aug 2022

माजी आमदार विनायक मेटे यांचं १४ ऑगस्टला पहाटे मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर अपघाती निधन झालं. या घटनेत विनायक मेटे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर आता एक ऑडिओ क्लिपही व्हायरल होते आहे. ज्यामुळे विनायक मेटे यांचा मृत्यू अपघात आहे की घातपात? याची चौकशी करण्याचीही मागणी होते आहे. अशात विनायक मेटे ज्या SUV ने प्रवास […]

Mumbaitak
follow google news

माजी आमदार विनायक मेटे यांचं १४ ऑगस्टला पहाटे मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर अपघाती निधन झालं. या घटनेत विनायक मेटे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर आता एक ऑडिओ क्लिपही व्हायरल होते आहे. ज्यामुळे विनायक मेटे यांचा मृत्यू अपघात आहे की घातपात? याची चौकशी करण्याचीही मागणी होते आहे. अशात विनायक मेटे ज्या SUV ने प्रवास करत होते त्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

हे वाचलं का?

विनायक मेटे यांचा मृत्यू ज्या SUV मध्ये झाला त्या गाडीवर काय चलन?

माजी आमदार विनायक मेटे ज्या SUV नी प्रवास करत होते , त्या कारवर एकूण 47 चलन झाले आहेत. त्यातील 14 चलनांची दंड वसुली केली गेली आहे आणि 33 चलनांचा एकूण 47 हजार रुपये चा दंड वसूल होणे बाकी आहे. जवळ जवळ सर्वच खटले हे over speeding चे आहेत.

महाराष्ट्र राज्यात सध्या विनायक मेटे यांच्या अपघाताचा विषय चर्चेत आहे. हा अपघात नेमका कसा झाला? कारमधल्या एअर बॅग्स का उघडल्या गेल्या नाहीत? हा अपघात नेमका कसा झाला? हे प्रश्न चर्चेत आहेत. अशात माजी आमदार विनायक मेटे यांच्या कारबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

आमदार विनायक मेटे यांचा अपघात ज्या एसयुव्ही मध्ये झाला त्या कारचा नंबर MH01 DP 6364 या क्रमांकाची आहे. या गाडीची माहिती जेव्हा मुंबई तकचे प्रतिनिधी समीर शेख यांनी वाहतूक कार्यालयातून काढली तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही माहिती अशी आहे की ही कार चालवणारा जो ड्रायव्हर आणि कारवर ४७ खटले आहेत. ओव्हरस्पीडचे खटले या कारवर सर्वाधिक आहेत.

जे खटले आहेत त्यापैकी १४ खटे मार्गी लागले आहेत. ११ हजारांचा दंड पोलिसांनी वसूल केला आहे. तर ३३ खटले बाकी आहे. ४७ हजार २०० रूपये याबाबत वसूल करणं बाकी आहे अशीही माहिती समोर आली आहे.

ज्योती मेटे फोन क्लिपबाबत काय म्हणाल्या आहेत?

३ ऑगस्टला असाच प्रकार घडल्याचे देखील अण्णासाहेब यांनी मला सांगितलं. त्यामुळे या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी झाली पाहिजे मला देखील यामध्ये संशय वाटतो आहे असं ज्योती मेटे यांनी म्हटलं आहे. अपघातातील गाडी आणि तीन तारखेची गाडी याची देखील चौकशी झाली पाहिजे आणि संपूर्ण प्रकाराची चौकशी करून न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी केली आहे.

विनायक मेटेंचा अपघातासंदर्भात कॉल रेकॉर्डिंग समोर आल्यानंतर या संदर्भात विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी प्रसारमाध्यमांशी चर्चा केली आहे. त्या म्हणाल्या की व्हायरल होत असलेली क्लिप मी आत्ताच ऐकली आहे. अण्णासाहेब मायकर यांच्याशी माझंही बोलणं झालं आहे. त्यांचं म्हणणं होतं की समोरच्या गाडीवर आपली गाडी नेऊन आदळावी अशा पद्धतीने गाडी ओव्हरटेक करत होती. ही बाब निश्चित आक्षेपार्ह होती. त्यामुळे एकूण प्रकारची झाली पाहिजे अशी मागणी ज्योती मेटे यांनी केली आहे.

    follow whatsapp