तुम्ही फिरायला कुठे जाता? महाबळेश्वर-पाचगणी, मनाली-काश्मिर आणि फार तर फार अमेरिका-युरोप जातो….पण जगातला एकेकाळचा सर्वात श्रीमंत माणूस कुठे फिरायला जातोय? थेट अंतराळात. जगभरात स्पेस टूरिझम सुरू झालंय….तुमच्यापैकी अनेक जण विचार करत असतील, आम्हाला कुठे अंतराळात जायला मिळणारे किंवा अंतराळात जाणं परवडणार तरी आहे का?
ADVERTISEMENT
पण साधारण शतकापूर्वी लोक विमानप्रवासाबद्दल पण असाच विचार करत होते…आणि आज बघा…आज लोक मुंबईहून-पुण्यालाही विमानाने जातात. त्यामुळे भविष्यात तुम्हालाही स्पेस टूरिझम करता येईल, यात शंका नाही….म्हणूनच आज आपण समजून घेऊयात की हे स्पेस टूरिझम नेमकं आहे काय? त्याचा खर्च किती, कोणाला ते करता येणार आहे?
लवकरच अंतराळात जाणं हे काही अंतराळवीरांपुरताच मर्यादित राहणार नाहीये….तर तिकीट घेऊन पर्यटकही तिथे जाऊ शकतील. या अंतराळ पर्यटनाला सुरूवातही झाली आहे. वर्जिन गॅलेक्टिट कंपनीचे संस्थापक रिचर्ड ब्रॅन्सन हे जगातले पहिले अरबपती ठरलेत, ज्यांनी अंतराळ पर्यटन केलंय.
आणि आता त्यांच्यानंतर जेफ बेजोस हे अंतराळ पर्यटन करणार आहेत. अमेझॉनवरून तुम्ही काही ना काही तरी ऑर्डर केलं असेलच आतापर्यंत…जेफ बेजोस हे याच अमेझॉन कंपनीचे संस्थापक आहेत. आजच बेजोस यांनी त्यांच्या ब्लू ओरिजिन या कंपनीने तयार केलेलं स्पेस क्राफ्ट ब्लू शेफर्डने अंतराळात उड्डाण घेतलंय.
Pegasus Phone Tapping : पेगॅससने फोन कसे होतात हॅक? समजून घ्या
स्पेस टूरिझम नेमकं आहे तरी काय? कसं होतं?
आतापर्यंत अंतराळात शिक्षण आणि प्रशिक्षण घेतलेले अंतराळवीरच जात होते…प्रत्येक देशाच्या राष्ट्रीय संस्था अंतराळवीरांना अवकाशात पाठवत. पण अमेरिका आणि रशिया अंतराळवीरांना अंतराळात नेणारी यानं तयार केली. अमेरिका आणि रशियात जणू एक स्पेस रेसच सुरू होती. याच शर्यतीत आता खाजगी कंपन्याही उतरल्या आहेत. तसा अंतराळात पहिला मानव हा 1961 मध्येच गेलेला, रशियाचे युरी गागारीन. पण आता स्पेस टूरिझमची चर्चा होण्याचं कारण म्हणजे हे एका खाजगी कंपनीद्वारे होणारं पहिलं स्पेस टूरिझम आहे.
आता 3 कंपन्या आहेत, ज्या हे स्पेस टूरिझम सुरू करतायत. एक रिचर्ड ब्रॅन्सन यांची वर्जिन गॅलेक्टीक दुसरी जेफ बेजोस यांची ब्लू ओरिजिन आणि तिसरी इलॉन मस्क यांची स्पेस एक्स. या तीन कंपन्या आता हे पर्यटन विश्व कसं विकसित करतायत, त्याच्यावर अंतराळ पर्यटनाचं पुढचं भवितव्य अवलंबून आहे.
जेवढ्या काळासाठी अंतराळवीर अंतराळात असतात, तेवढ्या वेळासाठी काही पर्यंटकांना इतक्यात अंतराळात राहता येणार नाहीये. काही मिनिटांपुरताच अंतराळ पर्यटन करता येणार आहे. रिचर्ड ब्रॅन्सन यांनीही केवळ 11 मिनिटांचाच प्रवास केला आहे.
जेफ बेजोस यांच्या ब्लू ओरिजिन कंपनीकडून अंतराळात जायचं असेल तर केवळ एका दिवसाचंच ट्रेनिंग घ्यायची गरज आहे तर तेच रिचर्ड ब्रॅन्सन यांच्या वर्जिन गॅलेक्टिक कंपनीकडून अंतराळात जायचं असेल तर 3 दिवसांचं प्रशिक्षण घेण्याची गरज आहे.
शिवाय ब्लू ओरिजिन यांच्या यानातून अंतराळात जायचं असेल तर वजन हे 50 ते 100 कीलोग्रॅम आणि उंची ही 5 ते 6.4. फूट इंचमध्ये असण्याची अट आहे.
What is Uniform Civil Code : समान नागरी कायदा म्हणजे काय? समजून घ्या
अंतराळात पर्यटक म्हणून जायचं असेल तर त्याचा खर्च किती असेल तो पाहा
जेफ बेजोस यांच्या ब्लू ओरिजिन कंपनीकडून तुम्ही जाणार असाल तर साधारण 2 ते 3 लाख डॉलर इतका खर्च येईल. हा खर्च भविष्यात वाढेल असंही त्यांनी सांगितलंय. ही किंमत माझ्यासह तुम्हालाही नक्कीच आपल्या आवाक्या पलिकडची वाटली असतील…पण तरीही आतापर्यंत 600 हून अधिकांनी तिकीट खरेदीही केले आहेत. 2022 पासून ब्लू ओरिजिन स्पेस टूरिझम सुरू करणार आहे.
तर तेच रिचर्ड ब्रॅन्सन यांच्या वर्जिन गॅलेक्टीक कंपनीही 2022 मध्ये अंतराळात पर्यटकांना घेऊन जाण्याच्या तयारीत आहे. त्यांनी तिकीटाची किंमत तर अजून जाहीर केलेली नाही. पण वर्षाला 400 उड्डाणं अंतराळात घ्यायचा त्यांचा मानस आहे.
अमेरिकेतील फ्लोरिडामधील एक कंपनी आहे स्पेस परस्पेक्टीव्ह म्हणून….तेही स्पेसशीप नेपच्यूनमधून अंतराळात पर्यटकांना घेऊन जाणार आहेत….1 लाख 25 हजार डॉलरला त्यांचं तिकीट असणार आहे. पण ते स्पेसपासून केवळ 30 किलोमीटर बाहेर जाणार आहे…पण तरीही 2024 पर्यंत त्यांचीही 300 तिकीट्स विकले गेले आहेत
समजून घ्या : Bitcoin म्हणजे काय? भारतात
क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार करता येतात का?
तुम्हाला साहजिक या सगळ्यावरून प्रश्न पडला असेल की, हे सगळं तर तिकडे सातासमुद्रापार सुरू आहे, आपण याचा का विचार करतोय? आपल्याकडे कुठे काय घडतंय?
अंतराळात जायचं म्हणजे खर्च अमाप येतो…आता अमेरिकेतल्या या कंपन्यांनी काय केलं, तर अंतराळात जाण्याचा जो खर्च होता, त्यात त्यांनी रियुसेजबल वेहिकल्स म्हणजेच पुनर्वापर करता येणाऱी वाहनं वापरली आहेत. आता सुद्धा ज्या यानातून बेजोस, ब्रान्सन अंतराळात जातायत, ते प्रेशराईज्ड आहेत, ज्यामुळे स्पेस सूट घालण्याची गरज भासत नाही….शिवाय ज्या कंपन्या आहेत त्यांना तांत्रिकदृष्ट्या नासाने मदतही केली आहे. इलॉन मस्क यांच्या स्पेस एक्स कंपनीचा 2008 मध्ये नासासोबत करारही झालेला, ज्याअंतर्गत स्पेस एक्स अंतराळातील इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये नासाचं सामानही पोहोचवतं.
पण भारतात आताशी स्पेस सेक्टर खाजगी कंपन्यांसाठी सुरू झालंय, जेणेकरून इस्रोसोबत या कंपन्या मिळून अंतराळ क्षेत्रात चांगली कामगिरी करू शकेल. पण भारतीय कंपन्यांनी अंतराळ पर्यटन सुरू करणं इतक्यात तरी शक्य नाहीये. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे भारतातली परिस्थिती बदलली आहे. प्रचंड बेरोजगारी महागाईमुळे भारतीय अंतराळ पर्यटनात किती पैसे टाकतील हा प्रश्नच आहे. भारतीय कंपन्यांनाही त्यामुळे या क्षेत्रात मार्केट दिसत नाहीये. अंतराळात गेलेल पहिले भारतीय राकेश शर्मा हे ही रशियाच्या स्पेस क्राफ्टमधून गेलेले, त्याच्याशिवाय कल्पना चावला आणि सुनिता विल्यिअम्स या दोघीही नासाकडून मिशनवर पाठवण्यात आलेल्या…
भारताने अजूनही स्वत:च्या स्पेसशीपमधून एकही अंतराळवीर पाठवलेला नाही. इस्रोचं गगनयान जे पहिलं मानवरहित यान अंतराळात पाठवलं जाणार आहे, त्याचीही टेस्ट फ्लाईट 2021 डिसेंबरमध्ये होईल. यात एकही मानव नसेल…हे मिशन यशस्वी झालं, तरच कदाचित अंतराळवीरांना भारताकडून पाठवता येईल.
ADVERTISEMENT