Farmer Long March: अस्वस्थ वाटलं अन्… लाँग मार्चमध्ये शेतकऱ्याचा मृत्यू

मुंबई तक

• 10:03 PM • 17 Mar 2023

farmer dies in long march : विविध मागण्यांसाठी नाशिकवरून मुंबईच्या दिशेने निघालेल्या लाँग मार्चमध्ये शुक्रवारी एक दुर्दैवी घटना घडली. लाँग मार्चचा वासींद येथे मुक्काम असताना एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. अवस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, तातडीने पुन्हा लाँग मार्चमध्ये सामील होण्याचा निर्णय जीवघेणा ठरला. दरम्यान, मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना सरकारकडून पाच लाख रुपयांची […]

Mumbaitak
follow google news

farmer dies in long march : विविध मागण्यांसाठी नाशिकवरून मुंबईच्या दिशेने निघालेल्या लाँग मार्चमध्ये शुक्रवारी एक दुर्दैवी घटना घडली. लाँग मार्चचा वासींद येथे मुक्काम असताना एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. अवस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, तातडीने पुन्हा लाँग मार्चमध्ये सामील होण्याचा निर्णय जीवघेणा ठरला. दरम्यान, मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना सरकारकडून पाच लाख रुपयांची मदत केली जाणार आहे.

हे वाचलं का?

कांद्याला भाववाढ देण्यासह विविध मागण्यांसाठी शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले आहेत. नाशिक येथून लाँग मार्चला सुरूवात झाली असून, हा मार्च मुंबईच्या दिशेने येत आहे.

दरम्यान, पायी निघालेल्या लाँग मार्चचा वासींद येथे मुक्काम होता. तिथेच 42 वर्षीय कुंडलिक जाधव या आंदोलक शेतकऱ्याला शुक्रवारी (17 मार्च) दुपारी त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांना 108 रुग्णवाहिकेतून शहापूर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले होते.

‘डॉक्टर म्हणाले भरती व्हा’

शहापूर उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यांना दाखल करण्यात आलं होतं. त्यांना डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिला पण, “मला आता बरे वाटतेय; मला आंदोलन ठिकाणी माझ्या बधू भगिनींसोबत सामील होऊद्या”, असे बोलून ते पुन्हा आंदोलन ठिकाणी म्हणजेच वासिंद मुक्कामी येथे गेले होते.

दरम्यान संध्याकाळी (17 मार्च) 8 वाजेच्या दरम्यान त्यांना पुन्हा त्रास झाला व उलट्या होऊ लागल्या. त्यानंतर पुन्हा त्यांना प्राथमिक उपचारार्थ शहापूर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार होण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. मयत जाधव हे नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातून या लाँग मार्चमध्ये सहभागी झाले होते. शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने लाँग मार्चमधील आंदोलकांतून हळहळ व्यक्त होत आहे.

“सरकारकडून मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत”

लाँग मार्चमध्ये सहभागी झालेले शेतकरी कुंडलिक जाधव यांचा वाटेतच मृत्यू झाला. या घटनेनंतर सरकारकडून भूमिका मांडण्यात आली. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी याबद्दल बोलताना सांगितलं की, मृत शेतकऱ्यांबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती घेतली आहे. मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाख रुपयांची मदत दिली जाईल, अशी माहिती दादा भुसे यांनी दिली.

    follow whatsapp