महावितरणकडून शेती पंपांची विज तोडली, स्वतःला जमिनीत गाडून घेत शेतकऱ्यांचं आंदोलन

इम्तियाज मुजावर

• 11:56 AM • 20 Dec 2021

गेल्या काही दिवसांपासून राज्यात शेतातील वीज पंपांना मिळणारी विज तोडणीचा मुद्दा चांगलाच गाजतो आहे. सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी भागातील शेतकरी आज महावितरणच्या याच कारभाराविरुद्ध आक्रमक झालेले पहायला मिळाले. काही दिवसांपूर्वी या भागातील शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयासमोर वीज जोडणी पुन्हा पुर्ववत करण्याचा इशारा दिला होता. परंतू महावितरणकडून यानंतरही काहीही कारवाई झाली नसल्यामुळे सुहास पिसाळ या शेतकऱ्याने स्वतःला जमिनीत […]

Mumbaitak
follow google news

गेल्या काही दिवसांपासून राज्यात शेतातील वीज पंपांना मिळणारी विज तोडणीचा मुद्दा चांगलाच गाजतो आहे. सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी भागातील शेतकरी आज महावितरणच्या याच कारभाराविरुद्ध आक्रमक झालेले पहायला मिळाले. काही दिवसांपूर्वी या भागातील शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयासमोर वीज जोडणी पुन्हा पुर्ववत करण्याचा इशारा दिला होता.

हे वाचलं का?

परंतू महावितरणकडून यानंतरही काहीही कारवाई झाली नसल्यामुळे सुहास पिसाळ या शेतकऱ्याने स्वतःला जमिनीत गाडून घेत महाविरणच्या कारभाराचा निषेध केला.

या आंदोलनादरम्यान पुसेसावळी भागातले अनेक शेतकरी हजर होते. सध्याच्या घडीला महावितरण ज्या पद्धतीने कृषी पंपाची विज तोडत आहे आणि ज्या पद्धतीने वीजबील वसूल केलं जात आहे ते जुलमी सावकारी पद्धतीचं असल्याचा आरोप आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी केली.

आठ दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी महावितरणला निवेदन देऊन जुलमी वीजबील वसूली व वीजतोडणी थांबविण्याची मागणी केली होती. मात्र, महावितरणने शेतकरी बांधवांच्या जिव्हाळ्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. कोरोनामुळे आधीच सर्व शेतकरी, मजूर, कामगार यांचे व्यवसाय कोलमडून सर्वसामान्यांचे जीवन धोक्यात आले आहे. त्यातच या सक्तीच्या वीजबीलवसूलीतून त्यांच्या दुःखावर मीठ चोळण्याचे काम केले जात असल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला.

शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा पाहून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली. कृषी पंपांची विज जोडणी पूर्ववत करण्याचं आश्वासन देण्यात आलं. तसेच वीज बिल दुरुस्तीसंदर्भात गावपातळीवर शेतकऱ्याची भेट घेऊन त्यातून मार्ग काढले जातील असंही आश्वासन महावितरणच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलं.

    follow whatsapp