कानपूर: कानपूरच्या श्याम नगरमध्ये रविवारी अनेक तास दहशतीचे वातावरण होते. एका साठेबाज व्यापाऱ्याने आपल्या मुलाशी वाद घातल्यानंतर गोळीबाराचा असा नंगा नाच केला की अनेक तास पोलीस आणि परिसरातील नागरिकांमध्ये गोंधळ उडाला. या दरम्यान व्यापाऱ्याने 2 तासात 30 गोळ्या झाडल्या.
ADVERTISEMENT
एवढेच नाहीतर त्याने थेट पोलिसांवर गोळीबार केला, त्यामुळे पोलिसांच्या गाडीचे नुकसान झाले, तर 3 पोलीस जखमी झाले. दोन तासांच्या प्रयत्नानंतर पोलिसांनी कसंतरी घरात घुसून आरोपीला ताब्यात घेतले. पोलीस कर्मचारी आणि अधिकारी सर्वांनी बुलेट प्रूफ जॅकेट घातले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, श्याम नगर येथील रहिवासी व्यापारी राजकुमार दुबे यांचा मुलगा सिद्धार्थसोबत वाद झाला होता. राजकुमार संतापला आणि त्याने घराबाहे येऊन परिसरात गोळीबार सुरू केला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांने पोलिसांवरही गोळीबार केला.
गोळीबारामुळे घाबरलेल्या पोलिसांनी तातडीने बुलेट प्रूफ जॅकेट मागवले. यानंतर संपुर्ण परिसराला छावणीचे स्वरुप आले. पोलिसांनी आरोपीला आत्मसमर्पण करण्यास सांगितले, मात्र त्याने पोलिसांवर गोळीबार सुरूच ठेवला. त्यामुळे पोलिसांच्या गाडीच्या काचा फुटल्या. दोन तासांनंतर पोलिसांनी कसंतरी घरात घुसून आरोपीला जेरबंद केले.
डीसीपी प्रमोद कुमार यांनी सांगितले की, राजकुमार यांचा मुलगा सिद्धार्थसोबत वाद सुरू होता. सुनेबाबतही काही वाद झाले. माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता त्याने गोळीबार सुरू केला. त्याने सुमारे 2 तासात परवानाधारक डबल-बॅरल बंदुकीने 30 गोळ्या झाडल्या. या गोळीबारात 3 पोलीस जखमी झाले आहेत.
पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याला मेडिकलसाठी नेण्यात आले आहे. राजकुमारचा धाकटा मुलगा सांगतो की, आम्ही दुसऱ्या घरात राहतो. वडील आणि भावामध्ये वाद झाला, त्यानंतर त्यांनी गोळीबार केला. एकाच वेळी अनेक गोळीबार करण्यामागे त्याचा हेतू काय होता याचा तपास पोलीस करत आहेत.
ADVERTISEMENT