– ज़का खान, बुलढाणा प्रतिनिधी
ADVERTISEMENT
८ मार्च हा आपल्या जागतिक महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. आजच्या दिवशी आपल्या घरापासून ते आपल्या समाजातील महिलांचा सन्मान करण्याचा प्रघात आहे. एखादं घर सांभाळण्यासाठी महिलांची जबाबदारी ही मोठी मानली जाते. घरातली मुलगी किंवा स्त्री भक्कम असली की ते घरी कधीच खचत नाही असं म्हणतात. बुलढाणा येखील बेलगाव येथीर रुपाली शामरावने याचंचं उदाहरण जगासमोर घालून दिलंय.
रुपालीचे वडील एस.टी. संपात सहभागी झाल्यामुळे घरच्या आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत गेले काही महिने बंद झालाय. फी चे पैसे नसल्यामुळे रुपाली बारावीची परीक्षाही देऊ शकली नाही. परंतू हार न मानता रुपालीने गाडी चालवण्याची जबाबदारी घेत आपल्या घरचा आर्थिक डोलारा सांभाळण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.
हालाकीच्या परिस्थितीत रुपालीने आपल्या वडिलांना आर्थिक आधारासोबत मानसिक आधार देत त्यांच्या खांद्याला खांदा लावत घर चालवण्याची जबाबदारी स्विकारली आहे. आजही रुपालीला गावात वाहन चालवताना पाहून अनेक जणं थक्क होतात. गेल्या तीन महिन्यांपासून रुपाली गावात वाहन चालवून आपल्या घराला आर्थिक हातभार लावते आहे. दिवसात गावात दोन ते तीन फेऱ्या झाल्या की रुपालीला इतर खर्च सोडून ३०० ते ३५० रुपये मिळतात. रुपाली वडील शामराव हे एस.टी. महामंडळाच्या मेहकर आगारात चालक म्हणून कार्यरत आहेत. परंतू संपामुळे त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती सध्या खालावली आहे.
बारावीची परीक्षा देण्यासाठी फी चे पैसे नसल्यामुळे रुपालीला यंदा परीक्षेला बसता आलं नाही. परंतू या गोष्टीचं दुःख न करता ती संघर्ष करते आहे. बारावीच्या परीक्षेतून मिळणाऱ्या यशापेक्षा आयुष्याच्या परीक्षेत रुपालीने दाखवलेली जिद्द ही कित्येक पटीने मोठी आहे.
मुख्याध्यापकापासून ते शिपायापर्यंत… सावित्रीच्या लेकी सांभाळत आहेत शाळेची धुरा
ADVERTISEMENT