बॉयफ्रेंडने हॉटेलमध्ये बुक केलेली रुम, तिथेच सापडला तरुणीचा मृतदेह

मुंबई तक

• 10:57 AM • 28 Feb 2022

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीच्या साउथ वेस्ट भागात हत्येची खळबळजनक घटना घडली आहे. महिपालपूर परिसरातील एका हॉटेलमध्ये तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. हत्येच्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. 27 फेब्रुवारी रोजी व्हीके साउथ पोलीस ठाण्यात महिपालपूर येथील लक रेसिडेन्सी हॉटेलमध्ये महिलेचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली. हॉटेलच्या खोलीत घुसून तरुणीची हत्या करण्यात आली असल्याची […]

Mumbaitak
follow google news

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीच्या साउथ वेस्ट भागात हत्येची खळबळजनक घटना घडली आहे. महिपालपूर परिसरातील एका हॉटेलमध्ये तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. हत्येच्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.

हे वाचलं का?

27 फेब्रुवारी रोजी व्हीके साउथ पोलीस ठाण्यात महिपालपूर येथील लक रेसिडेन्सी हॉटेलमध्ये महिलेचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली. हॉटेलच्या खोलीत घुसून तरुणीची हत्या करण्यात आली असल्याची यावेळी माहिती पोलिसांना देण्यात आली. तरुणीचा शिवम नावाचा एक मित्र आहे त्यानेच ही त्या केल्याचा आरोप तरुणीच्या कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे. हत्येनंतर आरोपी शिवम हा बेपत्ता असल्याचं समजतं आहे.

दरम्यान, या हत्येची माहिती मिळताच साउथ वेस्टचे डीसीपी हे घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी या संपूर्ण प्रकरणाबाबत तात्काळ माहिती घेऊन तपासाला सुरुवात केली.

पोलीस तपासात असे समोर आले की, गाझियाबादचा रहिवासी शिवम चौहान आणि तरुणी गेल्या चार वर्षांपासून गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड होते. हॉटेलमधील खोली ही शिवमने 25 फेब्रुवारीला बुक केली होती. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार दोघेही लग्न करणार होते. त्यामुळे घरच्यांना सांगून ती अनेकदा प्रियकरासह 1-2 दिवसांसाठी बाहेर फिरण्यासाठी जात असे.

यामुळेच मृत तरुणींच्या बहिणींचे म्हणणे आहे की, प्रियकरानेच तिची हत्या केली असावी. तरुणी नेहमी तिच्या प्रियकरासोबत लग्नाबाबत बोलायची आणि शिवम हा विषय वारंवार टाळत असे. त्यामुळेच त्याने तिची हत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

हॉटेलमध्ये झडती घेत असताना पोलिसांना दारूच्या बाटल्याही सापडल्या आहेत. हत्येच्या तपासासाठी गुन्हे शाखेच्या तज्ज्ञांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. पोलिसांनी तरुणीचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी सफदरजंग रुग्णालयात पाठवला आहे. त्यामुळे ही हत्या नेमकी कशी झाली हे पोस्टमॉर्टम अहवाल आल्यानंतरच समजू शकेल.

‘ती’ हत्या घरगुती वादातून नाही! बायको आणि मुलीचं प्रेमप्रकरण समजल्यामुळे वडिलांनी गमावला जीव

याप्रकरणी कायदेशीर कारवाई सुरू असून आरोपीला पकडण्यासाठी वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीची ओळख पटली असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल असंही पोलीस यावेळी म्हणाले.

    follow whatsapp