पुणे: पुण्यातील दत्तवाडी परिसरातील भाजपचे नगरसेवक आनंद रिठे यांच्याविरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या गुन्हा पोलिसात दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पुणे भाजपमध्ये एकच खळबळ माजली आहे.
ADVERTISEMENT
पुण्यातील एका नागरिकाने गळाफास घेतल्यानंतर आता त्याच्या मुलाने नगरसेवक आनंद रिठेविरोधात गंभीर आरोप केले आहेत. ‘नगरसेवक सतत आमचे घर पाडण्याची धमकी देत होता. त्यामुळेच माझ्या वडिलांनी या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली.’ असा आरोप आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या मुलाने केला आहे.
यावेळी त्याने असंही म्हटलं आहे की, आमच्या इमारतीवरील मोबाइल टॉवर देखील नगरसेवकाने काढून टाकलं होतं.
संजय महादेव सुर्वे (वय 46) हे पुण्यातील दत्तवाडी येथील महादेव बिल्डिंगमध्ये राहत होते. ज्यांनी गळाफास घेऊन आत्महत्या केली आहे. याचप्रकरणी नगरसेवक आनंद रिठे यांनी त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा आता दाखल करण्यात आला आहे.
पुण्यात बेरोजगारीला कंटाळून पत्नी आणि मुलाची हत्या करून तरूणाची आत्महत्या
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, संजय महादेव सुर्वे हे दत्तवाडी परिसरात राहत होते. त्यांनी इमारतीवर एका मोबाईल कंपनीचा टॉवर बसविला होता. ‘तुम्ही मला पैसे द्या, अन्यथा मोबाईल टॉवर काढून टाकला जाईल,’ अशी धमकी सतत भाजप नगरसेवकाकडून दिली जात असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.
ही कारवाई रोखण्यासाठी नगरसेवकाकडून अनेक वेळा पैशांची मागणी केली जात होती. दरम्यान, आनंद रिठे याने संजय सुर्वे यांच्या इमारतीवरील मोबाइल टॉवर काढून टाकण्यात यावा, असा अर्ज केला. त्यानुसार अधिकार्यांना सोबत घेऊन टॉवर काढून टाकण्यात आला. त्यानंतर आता फक्त टॉवर काढला आहे. पुढे घर देखील पाडू अशी सुर्वे यांना आनंद रिठे याने धमकी देणे सुरूच ठेवल्याचं तक्ररीत नमूद करण्यात आलं आहे.
स्वत:वर गोळी झाडण्यापूर्वी दीपाली चव्हाणांनी लिहलेल्या पत्रात नेमकं काय लिहलं होतं?, पाहा ‘ते’ पत्र
या मानसिक त्रासाला कंटाळून संजय सुर्वे यांनी दत्तवाडी परिसरातील पौर्णिमा सायकलच्या दुकानात नायलॉनच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
या घटनेची तक्रार त्यांचा मुलगा शशांक सुर्वे याने नगरसेवक आनंद रिठे विरोधात केली आहे. त्यानुसार पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. या तक्रारीनुसार आता पोलिसांनी याप्रकारणी तपास सुरु केला आहे. दरम्यान, अद्यापही भाजप नगरसेवकाला अटक करण्यात आलेली नाही.
याप्रकरणी संबंधित नगरसेवकावर कठोरात-कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
ADVERTISEMENT