पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक गौतम पाषाणकर यांच्याविरुद्ध आर्थिक फसवणूक व मारहाणीचा गुन्हा

मुंबई तक

• 07:09 AM • 12 Sep 2021

पुण्यातील उद्योजक गौतम पाषाणकर यांच्यासह अन्य दोघांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणूक आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील खराडी भागात फ्लॅटची २ कोटी ४० लाख रक्कम देऊनही त्याचा संबधित व्यक्तीला ताबा न दिल्याचं प्रकरण असून, गौतम पाषाणकर आणि अन्य दोघांनी संबधित व्यक्तीलाच मारहाण केली आहे. गौतम पाषाणकर, रिनल पाषाणकर आणि दीप पुरोहित यांच्या […]

Mumbaitak
follow google news

पुण्यातील उद्योजक गौतम पाषाणकर यांच्यासह अन्य दोघांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणूक आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील खराडी भागात फ्लॅटची २ कोटी ४० लाख रक्कम देऊनही त्याचा संबधित व्यक्तीला ताबा न दिल्याचं प्रकरण असून, गौतम पाषाणकर आणि अन्य दोघांनी संबधित व्यक्तीलाच मारहाण केली आहे.

हे वाचलं का?

गौतम पाषाणकर, रिनल पाषाणकर आणि दीप पुरोहित यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर नरेंद्र पंडितराव पाटील (वय 42 रा. शिवाजीनगर) असं फिर्यादीच नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्र पाटील यांनी खराडी परिसरात प्रॉक्सिमा क्रिएशन बिल्डिंग कन्स्ट्रक्शनच्या सी बिल्डिंगमध्ये पी 101 आणि 102 मधील फ्लॅट 2 कोटी 87 लाखांमध्ये खरेदी करण्याचा व्यवहार गौतम पाषाणकर, रिनल पाषाणकर आणि दीप पुरोहित यांच्या सोबत ठरला होता.

त्यानुसार फिर्याद नरेंद्र पाटील यांनी त्यापैकी वेळोवेळी अशी मिळून 2 कोटी 40 लाख रूपयांची रक्कम देखील दिली होती. मात्र त्याच दरम्यान 101 क्रमांकाची सदनिका गणेश शिंदे, तर 102 क्रमांकाची सदनिका मनीषा गोरद यांच्या नावावर कुलमुखत्यार करण्यात आली. याबाबतची माहिती फिर्यादी नरेंद्र पाटील यांना मिळताच त्यांनी तिघा आरोपींकडे याबाबत विचारणा केली.

पाटील यांनी चौकशी केल्यानंतर गौतम पाषाणकर यांच्यासह अन्य दोघांनी त्यांना जंगली महाराज रोडवरील ऑफिसमध्ये बोलवले. फिर्यादी नरेंद्र पाटील यांना मारहाण करण्यात आली. या मारहाणीत नरेंद्र पाटील यांचा पाय फ्रॅक्चर झाला आहे.

या घटनेनंतर नरेंद्र पाटील यांनी गौतम पाषाणकर, रिनल पाषाणकर, दीप पुरोहित या तिघांविरोधात शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून आर्थिक फसवणूक आणि मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

    follow whatsapp