Pune : IISER लॅबमध्ये आग, अग्निशमन दलाच्या जवानांकडून परिस्थितीवर नियंत्रण

मुंबई तक

• 11:21 AM • 16 Jul 2021

विज्ञान शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात आघाडीवर असलेल्या पुण्यातील IISER च्या लॅबमध्ये आज आग लागली. मिळालेल्या माहितीप्रमाणे लॅबमधील केमिकल रिअॅक्शनमुळे ही आग लागली. आग लागल्याचं कळताच लॅबमधील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी फायर सिस्टीमचा वापर करत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतू यामुळे आग आणखीनच भडकल्यामुळे अग्नीशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आलं. अग्नीशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात […]

Mumbaitak
follow google news

विज्ञान शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात आघाडीवर असलेल्या पुण्यातील IISER च्या लॅबमध्ये आज आग लागली. मिळालेल्या माहितीप्रमाणे लॅबमधील केमिकल रिअॅक्शनमुळे ही आग लागली. आग लागल्याचं कळताच लॅबमधील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी फायर सिस्टीमचा वापर करत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला.

हे वाचलं का?

परंतू यामुळे आग आणखीनच भडकल्यामुळे अग्नीशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आलं. अग्नीशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली आहे. IISER संस्थेत मोठ्या प्रमाणात PHD करणारे विद्यार्थी संशोधन करत असतात. या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र लॅबचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. IISER ही संस्था विज्ञान आणि संशोधन क्षेत्रात काम करणारी अग्रगण्य संस्था म्हणून ओळखली जाते. पुणे शहराव्यतिरीक्त या संस्थेच्या भोपाळ, बेहरामपूर, मोहाली, कोलकाता, तिरुअनंतपुरम आणि तिरुपती येथे शाखा आहेत.

    follow whatsapp