मुंबई: मुंबईतील भांडूप येथे ड्रीम मॉलमध्ये रात्री 11.30 च्या सुमारास आग लागली. अचानक लागलेल्या या आगीमुळे आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाली असल्याची प्राथमिक माहिती सध्या मिळते आहे. याच मॉलच्या तिसऱ्या मजल्यावर सनराईज नावाचं एक हॉस्पिटल आहे. जिथे 70 हून अधिक रुग्ण दाखल होते. यामधील सर्वाधिक रुग्ण हे कोरोना व्हायरसवर उपचार घेणारे होते. मिळालेल्या माहितीनुसार ज्या 10 जणांचा या आगीत होरपळून मृत्यू झाला आहे ते सर्व रुग्ण होते.
ADVERTISEMENT
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत रुग्णांना बाहेर काढून दुसऱ्या रुग्णालयात दाखल केलं.
मिळालेल्या माहितीनुसार ही आग लेव्हल-4 ची आहे. त्यामुळे आगीचं भीषण रुप पाहता अग्निशमन दलाच्या 20 हून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. गेल्या अनेक तासांपासून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान हे अथक प्रयत्न करत आहेत. याशिवाय रुग्णालयात कुणी रुग्ण अडकलेला तर नाही ना? याचा देखील शोध घेतला जात आहे.
सीरम इन्स्टिट्युटला लागलेली आग शॉर्ट सर्किटमुळे-अजित पवार
याबाबत अधिक माहिती देताना डीसीपी प्रशांत कदम म्हणाले की, जवळजवळ 90 ते 95 टक्के रुग्णांचा आगीपासून बचाव करण्यात आला आहे. यामध्ये काही रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समजतं आहे. दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याची भीती देखील त्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, ही आग नेमकी कशी लागली याची देखील सध्या चौकशी केली जात आहे. याबाबत अशी देखील माहिती मिळत आहे की, या ठिकाणचं फायर ऑडिट झालेलं नव्हतं. त्यामुळे आता या आगीची प्रशासनाकडून सखोल चौकशी केली जाणार आहे.
भंडारा दुर्घटना : निष्काळजीपणाबद्दल दोन नर्सविरोधात गुन्हा दाखल
रुग्णालयात होते सर्वाधिक कोरोना रुग्ण
सनराइज रुग्णालयात एकूण 76 रुग्ण होते. यापैकी 73 रुग्ण हे कोरोनाबाधित होते. तर इतर रुग्ण 3 होते. या रुग्णांपैकी 30 जणांना मुलुंडच्या जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. तर इतर तीन जणांना फोर्टिस रुग्णालयात दाखल केलं गेलं आहे. तर इतर रुग्णांना देखील वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे.
ADVERTISEMENT