सोलापूर : फटाक्यांच्या फॅक्टरीत मोठा स्फोट; २ जण मृत्यूमुखी, तिघांची प्रकृती चिंताजनक

मुंबई तक

• 11:22 AM • 01 Jan 2023

सोलापूर : नाशिकमधील इगतपुरी येथील जिंदाल ग्रुप कंपनीत मोठा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना ताजी आहे. अशातच सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात आगीची आणखी एक दुर्घटना घडली आहे. बार्शीमधील पांगरी गावाजवळील फटाका फॅक्टरीत भीषण स्फोट होऊन आग लागली आहे. यात २ जणांचा मृत्यू झाला असून तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार पांगरी […]

Mumbaitak
follow google news

सोलापूर : नाशिकमधील इगतपुरी येथील जिंदाल ग्रुप कंपनीत मोठा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना ताजी आहे. अशातच सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात आगीची आणखी एक दुर्घटना घडली आहे. बार्शीमधील पांगरी गावाजवळील फटाका फॅक्टरीत भीषण स्फोट होऊन आग लागली आहे. यात २ जणांचा मृत्यू झाला असून तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती आहे.

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार पांगरी गावात शिराळा रोडला ४ एकर क्षेत्रात फटक्यांची फॅक्टरी आहे. रविवारी दुपारी फॅक्टरीमध्ये फटाके बनवण्याचे काम सुरू असताना भीषण स्फोट झाला. स्फोट झाला त्यावेळी फॅक्टरीत जवळपास ४० कर्मचारी काम करत होते अशी प्राथमिक माहिती आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार यातील दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. तर ३ जण जखमी झाले होते. जखमींना पांगरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं आहे.

वेळेवर मदत न मिळाल्याचा स्थानिकांचा आरोप :

दरम्यान, स्थानिकांनी ‘मुंबई तक’ला दिलेल्या माहितीनुसार, स्फोट झाल्यानंतर तातडीने पांगरी पोलीस, १०८ रुग्णवाहिका, प्रशासन यांना फोन करण्यात आला. मात्र एक तासानंतर देखील कोणतीही मदत मिळाली नाही. फॅक्टरीच्या बाहेरील उसाच्या शेतात जखमी कर्मचारी गंभीर अवस्थेमध्ये पडले होते, अनेकदा फोन करुनही कोणतीही रुग्णवाहिका दाखल न झाल्याने अखेरीस पिकअप गाडीतून त्यांना उपचारासाठी दाखल करावं लागलं.

नाशिकमध्येही मोठी दुर्घटना :

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नाशिकमध्येही मोठी दुर्घटना घडली आहे. इगतपुरी तालुक्यातील मुंडेगाव जवळील जिंदाल कंपनीत रविवारी सकाळी एक स्फोट झाला. यात १४ कर्मचारी जखमी झाले असून त्यापैकी ११ जणांवर सुयश या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यातील दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. स्फोटामुळे कंपनीही आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने मोठं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कंपनीतील बॉयलर फुटल्याने लाग लागली आहे. या घटनेची माहिती मिळताच शहापूर, इगतपुरी, नाशिक महापालिका, एमआयडीसी, नॅशनल हायवे यांची अग्निशामक दलाचे जवान आणि बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही घटनेचा आढावा घेण्यासाठी नाशिकला रवाना झाल्याची माहिती मिळत आहे.

    follow whatsapp