गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह नजिकच्या शहराला पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. पावसाचा जोर पाहता स्थानिक प्रशासनाने लोकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलंय. तरीही नवी मुंबईत भर पावसात धबधब्यावर फिरायला गेले होते. पावसाचा जोर वाढल्यानंतर त्यांना परतण्याचा रस्ता मिळाला नसल्यामुळे ते अडकून पडले. अखेरीस अग्नीशमन दलाने या लोकांना बाहेर काढलं आहे.
ADVERTISEMENT
१०० पेक्षा जास्त लोकं सीबीडी बेलापूर परिसरातील निसर्गरम्य परिसरात असलेल्या धबधब्यावर अडकली होती. अग्नीशमन दलाला या घटनेची माहिती मिळताच त्यांनी एका शिडी आणि दोरखंडाच्या सहाय्याने सर्वांची सुखरुप सुटका केली. या रेस्क्यू ऑपरेशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
ADVERTISEMENT