राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची तक्रार शिंदे गट मोदी सरकारला तक्रार करणार-दीपक केसरकर

मुंबई तक

• 06:24 AM • 30 Jul 2022

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईविषयी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. मुंबईतून जर गुजराथी आणि राजस्थानी समाज निघून गेला तर मुंबईची आर्थिक राजधानी ही ओळख पुसली जाईल, मुंबईकडे पैसाच उरणार नाही असं वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. त्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका होते आहे. अशात आता शिंदे गटाची प्रतिक्रिया समोर आली आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते […]

Mumbaitak
follow google news

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईविषयी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. मुंबईतून जर गुजराथी आणि राजस्थानी समाज निघून गेला तर मुंबईची आर्थिक राजधानी ही ओळख पुसली जाईल, मुंबईकडे पैसाच उरणार नाही असं वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. त्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका होते आहे. अशात आता शिंदे गटाची प्रतिक्रिया समोर आली आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी राज्यपालांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. तसंच या प्रकरणी मोदी सरकारला पत्र लिहिणार असल्याचीही माहिती दीपक केसरकर यांनी दिली आहे.

हे वाचलं का?

काय म्हटलं आहे दीपक केसरकर यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या वक्तव्यावर?

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जे वक्तव्य केलं ते राज्याचा अपमान करणारं वक्तव्य आहे. राज्यपाल हे संवैधानिक पद आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना त्याबाबत केंद्र सरकारकडे तक्रार करण्याचा पूर्ण अधिकार असतो असं वक्तव्य दीपक केसरकर यांनी केलं आहे. अशी वक्तव्यं राज्यपाल कोश्यारी यांनी करू नयेत म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मोदी सरकारला पत्र पाठवतील असं दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नवा वाद निर्माण होऊ शकतो यात काहीही शंका नाही. त्यांचा एक व्हीडिओ सध्या व्हायरल होतो आहे. या व्हीडिओमध्ये त्यांनी मुंबई आणि ठाण्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांनी जे वक्तव्य केलं आहे त्यावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. आता दीपक केसरकर यांनी हे म्हटलं आहे की आम्ही याविषयीची तक्रार मोदी सरकारकडे करणार आहे.

काय म्हटलं आहे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी?

“कधी कधी मी महाराष्ट्रातल्या लोकांना सांगत असतो की महाराष्ट्रात खासकरून मुंबई आणि ठाण्यातून गुजराथी समाजाचे आणि राजस्थानी समाजाचे लोक निघून गेले तर तुमच्याकडे कुठले पैसे उरणारच नाहीत. मुंबईला जे आर्थिक राजधानी म्हटलं जातं ते म्हटलंही जाणार नाही” असं मुंबईबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी या व्हीडिओत बोलताना दिसत आहेत.

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी हा व्हीडिओ ट्विट करत आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सचिन सावंत यांनी ट्विटमध्ये म्हटलं की, “राज्याचा राज्यपाल त्याच राज्याच्या जनतेची बदनामी करतो हे भयंकर आहे. गुजराती राजस्थानी हा विषय राहू द्या यांनाच सर्वात आधी नारळ दिला पाहिजे. यांच्या कारकिर्दीत राज्यपाल या संस्थेचा आणि महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेचा स्तर तर खालावला आहेच, पण महाराष्ट्राचा अवमानही सातत्याने झाला आहे.”

    follow whatsapp