ADVERTISEMENT
दोन दिवस मुसळधार पावसाचा फटका बसल्यानंतर कोकणातली परिस्थिती आता हळुहळु पूर्वपदावर येते आहे. खेड येथील बाजारपेठेत पुराचं पाणी ओसरलं असून लोकं पुन्हा एकदा नवीन सुरुवात करायला सज्ज झाले आहेत.
पण ही सुरुवात सोपी नक्कीच नाहीये. संपूर्ण बाजारपेठ परिसरात चिखलाचं साम्राज्य पसरलं आहे. खेडमधील दुकानदार आपल्या दुकानात साचलेला चिखल साफ करताना.
या पुरामुळे अनेक दुकानदारांचा माल वाया जाऊन मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं आहे.
जी परिस्थितीत दुकानांच्या आत तीच परिस्थिती दुकानांच्या बाहेर. खेड शहरातील बहुतांश सर्वच रस्त्यांवर चिखल साचला आहे. जेसीबीच्या सहाय्याने हा चिखल आता साफ केला जातोय.
परंतू पुराने केलेली हानी मोठी आहे, त्यामुळे खेडला आणि कोकणाला सावरण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे.
अनेक दुकानांमध्ये पुराचं पाणी शिरुन मोठं नुकसान झालंय. ज्याचा मोठा आर्थिक फटका या दुकानदारांना सोसावा लागला आहे. साठवलेला सर्व माल या पुरात वाया गेला आहे.
काही माल हा इतका खराब झाला आहे की तो फेकून दिल्याशिवाय दुकानदारांकडे पर्याय नाहीये.
पुराने कोकणवासियांचं कंबरडं मोडलं आहे. अशा परिस्थितीत कोकणाला गरज आहे ती संपूर्ण महाराष्ट्राच्या मदतीची…
कोकणी माणूस हा स्वाभीमानी असतो. अशी कितीही संकटं आली तरीही त्याला तोंड देण्याची हिंमत त्याच्यात असते. फक्त त्याला सध्या गरज आहे ती कुसुमाग्रजांच्या कवितेत पाठीवर हात ठेवून लढ म्हणणाऱ्यांची…
ADVERTISEMENT