सोलापूर शहरात पहिल्यांदाच मशिदीमध्ये लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.शहरातील तेलंगी पच्चा पेठ येथील जेलरोड परिसरात असलेले नूरे इस्लामी मस्जिद ट्रस्ट च्या वतीने मोफत लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT
मुस्लिम समाजामध्ये लसीकरणाबाबत मोठ्या प्रमाणात गैरसमज पसरल्यामुळे लस घेण्यासाठी लोक पुढे येत नव्हते परंतु पहिल्यांदाच मशिदीमध्ये लसीकरण शिबिर आयोजन करण्यामध्ये मशिदीचे मौलवी, ट्रस्टी त्या प्रभागातील नगरसेवक यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर महानगरपालिकेने मशिदीमध्ये आयोजित केलेल्या शिबिरास 400 लोकांनी लस घेतली असून मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली आहे तसेच यामुळे लसीकरणाची गती सुद्धा वाढली आहे. तसेच मशिदीचे मौलवी यांनी मुस्लीम समाजाला लसीकरण करून घ्यावे असे आवाहनही या वेळी केले आहे.
आम्ही या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने लसीकरण शिबीराचं आयोजन केलं आहे. मागील एक आठवड्यापासून हे शिबीर लावण्यासाठी सगळेच प्रयत्न करत होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आलं आहे. जे लोक आले त्यांचे मी आभार मानतो. यापुढेही असे कार्यक्रम घेण्याची गरज आहे ते आम्ही जरूर घेऊ असं या मशिदीच्या मौलवींनी सांगितलं आहे.
आज नूरे इस्लाम या मशिदीत लसीकरण कार्यक्रम ठेवला आहे. सोलापूरच्या या भागातील लोकांमध्ये लसीकरणाबाबत काही गैरसमज होते. मात्र मौलवींनी पुढाकार घेतला आणि त्यांनी लोकांना समजावून सांगितलं त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोक लस घेण्यासाठी आले. हा अत्यंत चांगला उपक्रम आहे. इथले नगरसेवक आहेत रियाज त्यांनीही पुढाकार घेतला. आता लोकांमध्ये लस घेण्याचं महत्त्व पटलं आहे. कोरोनाची तिसरी लाट येऊ नये, ओमिक्रॉनचा शिरकाव होऊ नये यासाठी ही मोहीम आयोजित करण्यात आली आहे. लस घेण्यात कुठलाही धोका नाही असंही असं वक्तव्य पालिका आयुक्त धनराज पांडे यांनी केलं आहे.
ADVERTISEMENT