मेळघाट: अमरावतीमधील मेळघाट हरिसाल व्याघ्र प्रकल्पाच्या RFO दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येच्या बातमीने वनविभागासह संपूर्ण मेळघाटमधील नागरिकांना धक्का बसला आहे. ‘लेडी सिंघम’ अशी ओळख असलेल्या दीपाली चव्हाण यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. आपल्या धडाकेबाज कामगिरीमुळे दीपाली चव्हाण यांना मेळघाटमधील ‘लेडी सिंघम’ असं म्हटलं जायचं. जाणून घ्या दीपाली चव्हाण यांच्याविषयी नेमकी माहिती.
ADVERTISEMENT
नेमक्या कोण होत्या दीपाली चव्हाण
दीपाली चव्हाण या मूळच्या कोकणातील दापोलीतील आहेत. पण लहानपणीच त्या आपल्या आई-वडिलांसोबत साताऱ्यात स्थायिक झाल्या होत्या. इथेच त्यांनी आपलं प्राथमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण साताऱ्यातच पूर्ण केलं होतं. मराठी, हिंदी इंग्रजी आणि जपानी भाषाही त्यांना अवगत होती. मुळातच हुशार असलेल्या दीपाली चव्हाण यांना स्पर्धा परीक्षांची आवड होती. त्यामुळे त्यांनी त्या परीक्षा देण्यास सुरुवात केली होती.
Dipali Chavan: महिला अधिकारी दीपाली चव्हाणांची गोळी झाडून आत्महत्या
2012 साली त्या MPSC परीक्षेत उत्तीर्ण झाल्या होत्या. तर 2014 साली त्यांना पहिलं पोस्टिंग मिळालं होतं. त्यांना विदर्भातील धूळघाट या ठिकाणी पोस्टिंग मिळाल्यानंतर त्यांनी येथील पुनर्वसन कामांमध्ये चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे सक्षम अधिकारी अशी त्यांची ओळख निर्माण झाली होती.
दुसरीकडे वनसंपत्तीला धोका पोहचवणारी जी लोकं होती त्यांच्यावर अतिशय कठोर कारवाई देखील त्यांनी केली होती. काही दिवसांपूर्वी डिंक चोरी करणाऱ्या काही तस्करांचा त्यांनी थेट मध्यप्रदेशच्या बॉर्डरपर्यंत पाठलाग केला होता. यामुळे ‘लेडी सिंघम’ अशी त्यांची ओळख निर्माण झाली होती.
यामुळे जंगलातील तस्करी करणारे आणि जनावरांची शिकार करणाऱ्यांनी दीपाली चव्हाण यांची बरीच धास्ती घेतली होती. त्यांच्या या स्वरुपांच्या कारवाईमुळे तस्करांमध्ये धाक निर्माण झाला होता.
‘गर्भपात झाला तरी रजा दिली नाही’, वाचा दीपाली चव्हाणच्या पतीची संपूर्ण मुलाखत
दरम्यान, 2018 साली हरिसाल गुलगाम येथे त्यांची पोस्टिंग झाली होती. यावेळी व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात त्या तैनात होत्या. दरम्यान, 2019 साली राजेश मोहिते यांच्यासोबत त्या विवाह बंधनात अडकल्या. राजेश हे मोहिते हे अमरावतीच्या जिल्हा कोषागार कार्यालयात आहेत. त्यामुळे साताऱ्याच्या असणाऱ्या दीपाली चव्हाण यांचं अमरावती हे सासर आहे.
आपल्या सात वर्षाच्या कारकीर्दीत दीपाली चव्हाण यांनी चांगली कामगिरी केली असल्याचे अनेक जण आजही बोलत आहे. अशा तडफदार अधिकाऱ्याचा अशा पद्धतीने दुर्दैवी अंत झाल्याने मेळघाटात हळहळ व्यक्त केली जात आहे.
….आणि ही ठरली दीपाली चव्हाण यांची अखेरची Facebook Post
दीपाली चव्हाण यांनी सुसाइड नोटमध्ये नेमके काय आरोप केले आहेत?
दीपाली चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी लिहलेल्या सुसाइड नोटमध्ये असा आरोप केला आहे की, ‘माझ्या आत्महत्येला वरिष्ठ अधिकारी विनोद शिवकुमार आणि वन्यजीव विभाग चिखलदरा हेच जबाबदार आहेत.’ या सुसाइड नोटमध्ये विनोद शिवकुमार यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.
स्वत:वर गोळी झाडण्यापूर्वी दीपाली चव्हाणांनी लिहलेल्या पत्रात नेमकं काय लिहलं होतं?, पाहा ‘ते’ पत्र
‘विनोद शिवकुमारने मला अत्यंत त्रास दिला आहे. त्यांनी रजा कालावधीतील सुट्टी सुद्धा नाकारली होती. ऑक्टोबर 2020 मध्ये मी प्रेग्नंट असताना मला विनोद शिवकुमार यांनी ट्रॅकिंग करवलं गेलं. त्यामुळे माझा गर्भपात झाला. एवढंच नव्हे तर त्यावेळी देखील मला पुरेशी सुट्टी देण्यात आली नाही. तसंच विनोद शिवकुमार हे मला रात्रीबेरात्री कुठेही भेटण्यासाठी अश्लील भाषेत बोलायचे. यावेळी ते माझे मानसिक आणि आर्थिक नुकसान करत होते.’
‘अनेकदा सार्वजनिक ठिकाणी अनेक लोकांसमोर मला शिवीगाळ केली ज्यायची. अनेकदा शिवकुमारने मला त्यांच्या संकुलात बोलावले होते. ते माझ्या एकटेपणाचा गैरफायदा करत होते. पण मी त्यांच्या मर्जीनुसार न वागल्याने आता ते मला त्याच शिक्षा देत आहेत. मागील आठवड्यापासून शिवकुमार हे माझ्याशी खूप वाईट शब्दात बोलत आहेत. ज्याचा मला मानसिक त्रास होतोय.’ असे आरोप सुसाइड नोटमध्ये करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT