कल्याण-डोंबिवली महापालिकेतील भाजपचा माजी नगरसेवक सचिन खेमा याच्यावर पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. कल्याणच्या विशेष मोक्का न्यायालयाने त्याला ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. खेमा विरोधात महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात खंडणी, प्राणघातक हल्ला यासह आठ गुन्हे दाखल आहेत.
ADVERTISEMENT
खेमा याने कल्याणमधील भूषण जाधव याला शिवसेनेचे पदाधिकारी अरविंद मोरे यांच्याबरोबर फिरतो म्हणून जीवे मारण्याची धमकी देत मारहाण केल्याची घटना ३ जानेवारीला रात्री साडे अकरा वाजता घडली होती. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात खेमाविरोधात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान या प्रकरणातील साक्षीदार असलेले व्यापारी अमजद सय्यद याला धंदा चालू ठेवायचा असेल तर पाच लाख रूपये दे अशी खंडणीची धमकी देत त्याच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना ५ जानेवारीच्या पहाटे घडली होती.
कल्याणमधील संतापजनक घटना! 2 वर्षांपासून बाप आणि भाऊच करत होते बलात्कार
या घटनेतही खेमासह पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. या दोन्ही गुन्हयांप्रकरणी खेमासह अन्य एकाला पोलिसांनी अटक केली होती. तो न्यायालयीन कोठडीत होता. दरम्यान त्याच्यावर दाखल असलेले गुन्हे आणि वाढती गुन्हेगारी पाहता त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई प्रस्तावित केली होती. यासंदर्भातला अहवाल पोलीस महासंचालकांकडे पाठविण्यात आला होता. त्याला मान्यता मिळाली आहे.
भाजपला दे धक्का –
दरम्यान खेमाच्या सुटकेसाठी भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून प्रयत्न सुरू होते. खेमा सह अन्य दोन नगरसेवकांना सत्ताधारी शिवसेनेने जाणीवपूर्वक अडकवल्याचा आरोप करीत भाजपने राज्य सरकारविरोधात अप्पर पोलिस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता. परंतू पोलिसांनी परवानगी नाकारल्याचे हा मोर्चा रद्द करण्यात आला. त्यानंतर खेमा विरोधात मोक्का अंतर्गत झालेली कारवाई आगामी मनपा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला ‘दे धक्का’ असल्याचे बोलले जात आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले नगरसेवक आणि पदाधिका-यांचे धाबे दणाणल्याची चर्चा देखील जोरदार सुरू आहे.
चाकूचा धाक दाखवून एक्स्प्रेस गाडीत प्रवाशांना लुटण्याचा प्रयत्न, दरोडेखोर अटकेत
ADVERTISEMENT