Santosh Kharat : आदित्य ठाकरेंची साथ सोडली, वरळीत शिवसेनेला (UBT) धक्का

ऋत्विक भालेकर

• 10:36 AM • 30 Jan 2023

Santosh Kharat joined balasahebanchi Shiv Sena : मुंबई महापालिकेच्या निवडणुका (BMC Election)कधी होणार? याबद्दल अनिश्चित असली, तरी राजकीय वातावरण तापू लागलं आहे. सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागलेले असताना आदित्य ठाकरेंच्या (Aaditya Thackeray) वरळीत मतदारसंघातच (worli constituency) शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) धक्का बसला. वरळीतील माजी नगरसेवकाने एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebanchi Shiv Sena) […]

Mumbaitak
follow google news

Santosh Kharat joined balasahebanchi Shiv Sena : मुंबई महापालिकेच्या निवडणुका (BMC Election)कधी होणार? याबद्दल अनिश्चित असली, तरी राजकीय वातावरण तापू लागलं आहे. सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागलेले असताना आदित्य ठाकरेंच्या (Aaditya Thackeray) वरळीत मतदारसंघातच (worli constituency) शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) धक्का बसला. वरळीतील माजी नगरसेवकाने एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebanchi Shiv Sena) पक्षात प्रवेश केला.

हे वाचलं का?

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातराचे वारे सुरू झाले आहेत. ठाकरे आणि शिंदे गटाने मोर्चेबांधणीला सुरू केली असून, आता ठाकरे गटाला वरळीतच धक्का दिलाय. आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेल्या वरळीतील शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी नगरसेवकाने एकनाथ शिंदेंच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. वरळीतील माजी नगरसेवक संतोष खरात यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.

आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातून शिंदे गटात जाणारे संतोष खरात हे पहिले माजी नगरसेवक असल्याचं सांगितलं जात आहे. संतोष खरात हे वरळीतील वार्ड क्रमांक 195 मध्ये नगरसेवक होते.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यभरात ठाकरे गटातील अनेक नेते शिंदेंसोबत गेले, मात्र मुंबईतील नगरसेवक फारसे शिंदे गटात गेल्याचं दिसलं नाही. मात्र, आता आदित्य ठाकरेंच्याच मतदारसंघातील माजी नगरसेवक शिंदे गटाच्या गळाला लागला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला आणखी गळती लागू शकते अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे.

बाळासाहेबांची शिवसेना : संतोष खरातांनी आदित्य ठाकरेंची साथ का सोडली?

संतोष खरात यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांची भूमिका मांडली. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंवर बचावात्मक टीका केली. “ठाकरे यांना आव्हान नाही, जनतेच्या विकासासाठी निर्णय घेतला,” असं ते म्हणाले.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेला विरोध नाही, पण सामान्य माणसाच्या विकासापासून तो दूर आहे. म्हणावी अशी विकासाला गती मिळाली नाही म्हणून एकनाथ शिंदे यांच्या सोबत आलो आहे”, असं म्हणत खरातांनी आदित्य ठाकरेंना लक्ष्यही केलं.

“वरळी बीडीडी चाळ पुनर्विकासासंदर्भात अनेक प्रश्न वरिष्ठांसमोर मांडले, पण दखल घेतली गेली नाही. वरळी मतदारसंघात गटातटाचे राजकारण वाढलं आहे. विभाग प्रमुखांचा एक गट तर आमदारांचा दुसरा गट आहे. नेत्यांच्या भांडणात कार्यकर्त्यांचं हाल होत आहे. यामुळे सामान्य माणूस विकासापासून वंचित राहत आहे”, असं संतोष खरात ठाकरेंची साथ सोडल्यानंतर म्हणाले.

    follow whatsapp