नरड्यावर बसून एकरकमी FRP वसूल करु, राजू शेट्टींचा कारखानदारांना सज्जड दम

मुंबई तक

• 12:34 PM • 25 Oct 2021

राज्यात साखर कारखानदाराच्या एफआरपीचा प्रश्न पुन्हा एकदा पेट घेण्याची शक्यता आहे. एफआरपी जाहीर न करता त्याचे तुकडे पाडण्याची भूमिका घेऊन सुरू झालेले कारखाने आम्ही बंद पाडू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला आहे. एफआरपीबद्दल भूमिका न घेणाऱ्या कारखान्यांना ऊस वाहतूक करणारी वाहनं रोखली जातील, वेळ पडल्यास कारखानदारांच्या नरड्यावर बसून आम्ही एफआरपी […]

Mumbaitak
follow google news

राज्यात साखर कारखानदाराच्या एफआरपीचा प्रश्न पुन्हा एकदा पेट घेण्याची शक्यता आहे. एफआरपी जाहीर न करता त्याचे तुकडे पाडण्याची भूमिका घेऊन सुरू झालेले कारखाने आम्ही बंद पाडू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला आहे.

हे वाचलं का?

एफआरपीबद्दल भूमिका न घेणाऱ्या कारखान्यांना ऊस वाहतूक करणारी वाहनं रोखली जातील, वेळ पडल्यास कारखानदारांच्या नरड्यावर बसून आम्ही एफआरपी वसूल कर असा सज्जड दम शेट्टी यांनी दिलाय. ते कराड येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

राजू शेट्टी म्हणाले, “कोल्हापूर व बेळगाव जिल्ह्यातील कारखान्यांनी एकरकमी एफआरपी जाहीर केली आहे. ही एफआरपी 2900 रुपयांपासून 3200 रुपयांपर्यंत आहे. महाराष्ट्रातील अनेक कारखाने शेतकऱ्यांच्या खात्यावर एकरकमी एफआरपी वर्ग करायला तयार झाले आहेत. मात्र ज्या सातारा जिल्ह्यामध्ये स्व. यशवंतराव चव्हाण व स्व. पी. डी. पाटील यांचा वारसा सांगत बाळासाहेब पाटील राज्याचे सहकार मंत्री झाले. आणि स्वतः सहकार मंत्रीच एकरकमी एफआरपी देणे शक्य नसल्याचे सांगत आहेत. खरे तर राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कायद्याप्रमाणे मिळणारे संरक्षण देण्याची जबाबदारी ही सहकार मंत्र्यांची आहे. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची शेतकऱ्यांच्या रक्षकाची भूमिका असताना ते भक्षका सारखे वागत आहेत. त्यामुळे बाळासाहेब पाटील हे सहकार मंत्री आहेत की सह्याद्रीचे चेअरमन हे एकदा त्यांनी स्पष्ट करावे.”

यावेळी बोलत असताना राजू शेट्टींनी बाळासाहेब पाटलांवर हल्ला चढवला. राज्याचा सहकार मंत्री म्हणून कायद्यामध्ये असलेल्या तरतुदींची अंमलबजावणी करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. ते कारखान्याचे चेअरमन नंतर आहेत आधी राज्याचे सहकार मंत्री आहेत. त्यांना या कर्तव्याची जाणीव आम्ही करून देण्याची गरज नाही. सातारा जिल्हाधिकारी यांनी आज एक रकमी एफआरपी बाबत बैठक बोलावली होती. मात्र ही बैठक रद्द झाली असून त्या पाठीमागेही बाळासाहेब पाटील यांचाच हात असू शकतो, असा आरोपही राजू शेट्टी यांनी केला. याच्या प्रतिक्रिया आजपासूनच उमटल्याशिवाय राहणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावे. राज्यातील तीस-पस्तीस कारखान्यांना एकरकमी एफआरपी देणे शक्य आहे तर मग बाळासाहेब पाटील यांनाच का अडचण यायला लागली आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

    follow whatsapp