चार तृतीयपंथीयांनी वाहतूक पोलिसाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. मुंबईतल्या घाटकोपर पंतनगर भागात ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार तृतीयपंथीयांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी संध्याकाळी छेडा नगर जंक्शन जवळ विनोद सोनावणे हे वाहतूक पोलीस ऑन ड्युटी होते. विनोद सोनवणे हे वाहतूक शाखेच्या विक्रोळी येथील शाखेत विनोद सोनवणे काम करतात.
ADVERTISEMENT
सोनवणे ड्युटीवर असताना त्यांनी ही गोष्ट पाहिली की चारजण रिक्षातून प्रवास करत आहेत. त्यामुळे त्यांनी तातडीने ही रिक्षा थांबवली आणि रिक्षाचे फोटो घेण्यास सुरूवात केली. E चलान करण्यासाठी ते फोटो काढत होते. त्यावेळी चार तृतीयपंथीयांनी सुरूवातीला सोनवणे यांना शिव्या देण्यास सुरूवात केली आणि त्यानंतर लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.
या मारहाणीच्या वेळी या चार तृतीयपंथीयांनी या पोलिसाचा गणवेश इतक्या जोरात खेचला की तो फाटला आणि त्याची बटणंही तुटली. या चार जणांनीही सुरूवातीला मला शिव्या दिल्या आणि नंतर मारहाण करण्यास सुरूवात केली असंही विनोद सोनावणे यांनी त्यांच्या जबाबात सांगितलं आहे. मी त्यांना हे सांगत होतो की मी माझं काम करतो आहे, माझ्याशी अशाप्रकारे बोलू नका तरीही त्यांनी माझं ऐकलं नाही. जेव्हा या पोलिसाला मारहाण करण्यात आली तेव्हा तिथे मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. मारहाण करणाऱ्या चारपैकी ओळख पटलेल्या लव्हली पाटील या तृतीयपंथीयाने या पोलिसाचा वॉकी टॉकी खेचला आणि तोही फोडला.
ADVERTISEMENT