नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी महत्वाची घोषणा केली आहे. पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या वाहनांमुळे होणाऱ्या प्रदुषणाला आळा घालण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय समोर आला आहे. यासाठीचं पहिलं पाऊल म्हणून राज्यातील सर्व सरकारी वाहनं इलेक्ट्रीक होणार असल्याचं आदित्य ठाकरेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
राज्य सरकारने याआधीच हा निर्णय जाहीर केला होता. १ एप्रिल २०२२ पासून या निर्णायाची अंमलबजावणी होणार होती. परंतू आदित्य ठाकरेंनी या निर्णयाची अंमलबजावणी आता १ जानेवारी २०२२ पासूनच होणार असल्याचं जाहीर केलं आहे.
या निर्णयासाठी आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उप मुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे आभार मानले आहेत. आपल्या सभोवतालचा परिसर प्रदुषणविरहीत करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचं आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलं.
पेट्रोल-डिझेलमुळे होणाऱ्या प्रदुषणामुळे गेल्या काही वर्षांपासून सरकारी पातळीवर इलेक्ट्रीक वाहनांच्या वापरावर जोर दिला जात आहे. अनेक कंपन्याही इलेक्ट्रीक गाड्यांच्या मार्केटमध्ये उतरल्या आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही अनेकदा इलेक्ट्रीक गाड्यांच्या वापराचं महत्व अधोरेखित केलं आहे.
ADVERTISEMENT