गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटातील आणखी एक खासदार गजानन किर्तीकर यांनी अखेर बाळासाहेबांची शिवसेना पक्षात अर्थात शिंदे गटात प्रवेश केला आहे. रवींद्र नाट्यगृहातील एका कार्यक्रमाला किर्तीकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह उपस्थित आहेत. या दरम्यान हा प्रवेश पार पडला. यानंतर आता त्यांचा मुलगा अमोल किर्तीकर यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.
ADVERTISEMENT
काय म्हटलं आहे अमोल किर्तीकर यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये?
शिवसेनेचे जेष्ठ नेते सुभाष देसाईसाहेबांच्या नेतृत्वाखाली गोरेगाव विधानसभेतील पदाधिकाऱ्यांची बैठक आज संपन्न झाली. यावेळी शिवसेनेच्या भविष्यातील वाटचालीसंदर्भात देसाईसाहेबांनी मार्गदर्शन केले. येत्या महापालिका निवडणुकीत पक्षप्रमुख उद्धवसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली गोरेगाव विधानसभेतील सर्व प्रभागातून शिवसेनेचे उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार केला.
वडिलांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची साथ सोडल्यानंतर गोरेगाव विभागातून सर्व उमेदवार निवडणून आणण्याचा निर्धार अमोल किर्तीकर यांनी केला आहे. त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी तसा उल्लेख केला आहे. गजानन किर्तीकर हे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहे. या मतदारसंघातून एकेकाळी काँग्रेसचे दिवंगत नेते सुनील दत्त, भाजपचे दिवंगत नेते राम जेठमलानी, शिवसेनेचे दिवंगत नेते मधुकर सरपोतदार, काँग्रेस नेत्या प्रिया दत्त आणि काँग्रेसचे दिवंगत नेते गुरुदास कामत विजयी झाले आहेत.
काय म्हटलं आहे संजय राऊत यांनी गजानन किर्तीकरांविषयी?
गजानन किर्तीकर हे आमचे ज्येष्ठ सहकारी होते. पक्षानं त्यांना काय दिलं नाही. ते पाच वेळा आमदार राहिले आहेत, तर दोन वेळा पक्षाकडून त्यांना खासदारकी मिळाली. दोन वेळा त्यांचा मंत्रीमंडळात समावेश होता असे राऊत यावेळी म्हणाले. त्यांचे पुत्र अमोल किर्तीकर के कडवट शिवसैनिक आहेत, ते पक्षाबरोबरच असल्याचे राऊत म्हणाले. गजानन किर्तीकर यांच्यासारखे नेते ज्यावेळी सर्व काही भोगून पक्ष सोडून जातात, तेव्हा लोकांच्या मनात निष्ठा या शब्दाविषयी वेगळी भावना निर्माण होते असे राऊत म्हणाले.
ADVERTISEMENT