आपल्या सगळ्यांच्या लाडक्या बाप्पाचं आगमन आज घरोघरी होतं आहे. दोन वर्षे कोरोनाचं संकट होतं. त्या संकटातून बाहेर पडत पहिल्यांदाच धुमधडाक्यात उत्सव साजरा होतो आहे. अशात आपल्या आप्त स्वकियांना, मित्रमंडळींना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देण्यासाठी काय काय पर्याय असू शकतात? आम्ही तुम्हाला हेच या बातमीतून सांगत आहोत. अशा प्रकारे गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा तुम्ही देऊ शकता.
ADVERTISEMENT
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.. हे कार्ड तुम्ही व्हॉट्स अॅप किंवा फेसबुकवर फॉर्वर्ड करू शकता.
ओम गं गणपतेय नमः हा गणपती बाप्पाचा मंत्र आहे. तसंच वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरू मे देव सर्वकार्येशू सर्वदा हा देखील मंत्र या कार्डवर आहे. हे कार्डही तुम्ही शुभेच्छा म्हणून आजच्या दिवशी पाठवू शकता.
आजच्या मंगलदिनी
सर्व गणेशभक्तांच्या मनातील
सर्व ईच्छित मनोकामना
श्री गणराय पूर्ण करोत,
हिच गणरायाच्या चरणी प्रार्थना
गणेश उत्सव निमित्त सर्वांना मंगलमयी शुभेच्छा!
असंही कार्ड तुम्ही पाठवू शकता.
गणेश पूजेचा मुहूर्त कधी आहे?
सकाळी ११.२४ ते दुपारी १ वाजून ५४ मिनिटं
गणेश विसर्जन कधी होणार?
९ सप्टेंबर २०२२ या दिवशी अनंत चतुर्दशी आहे. त्याच दिवशी बाप्पाला निरोप दिला जाईल
वंदन करतो गणरायाला
हात जोडते वरद विनायकाला
प्रार्थना करतो गजानानाला
सुखी ठेव नेहमी
सर्व गणेश भक्तांना
श्री गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा
सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत, सर्वांना
सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया!!!
गणेश चतुर्थीच्या दिवशी घरी बसवण्यात आलेल्या मूर्तीला काय अर्पण कराल?
गणेश चतुर्थीला घरी बसवण्यात आलेल्या बाप्पाच्या मूर्तीला दुर्वा वाहिला जातात. २१ दुर्वांची एक जुडी असते. अशा २१ जुड्यांची माळ गणपतीला घालण्याची प्रथा आहे. मोदक हे गणपतीला प्रिय आहेत. त्यामुळे या दिवशी मोदकांचा नैविद्य दाखवावा. याच दिवशी बाप्पाला शेंदूरही वाहिला जातो. तसंच पूजा करणाऱ्या प्रत्येकाने शेंदूर कपाळाला लावण्याचीही प्रथा आहे.
सर्वांना गणेश चतुर्थीच्या
हार्दिक शुभेच्छा
तुमच्या मनातील सर्व मनोकामना
पूर्ण होवोत, सर्वांना सुख, समृद्धी ,
ऐश्वर्य, शांती आणि आरोग्य लाभो
बाप्पांच्या चरणी प्रार्थना
गणपती बाप्पा मोरया
मंगलमुर्ती मोरया
पाहून ते गोजिरवाणं रम्य रूप
मोह होई मनास खूप
ठेविण्या तुज हाती मोदक प्रसाद
होते सदैव दर्शनाची आस
नाव घेऊनिया मोरयाचे मुखी
मन वाट पाहते फक्त तुझ्या आगमनाची
गणेश उत्सव कधी आहे? काय आहे शुभ मुहूर्त?
२०२२ मध्ये गणेश उत्सव ३१ ऑगस्टला येतो आहे. गणपती हा ६४ कलांचा अधिपती आहे. तसंच गणपती बुद्धी, समृद्धीची देवता आहे. तसंच सगळ्या देवांमध्ये सर्वात आधी पूजेचा मान मिळतो तो गणपतीलाच. १० दिवस गणेश उत्सव चालतो. त्यानंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशीला बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन केलं जातं. कृत्रीम तलाव, नदी, तलाव, समुद्रात गणपती बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन केलं जातं. भाद्रपद शुक्ल गणेश चतुर्थी ३० ऑगस्ट रोजी दुपारी ३:३४ वाजता सुरू होईल आणि ३१ ऑगस्ट रोजी दुपारी ३:२३ वाजता समाप्त होईल. ३१ ऑगस्ट रोजी दुपारी ३.३० वाजेपर्यंत गणपतीच्या मूर्तीच्या स्थापनेचा शुभ मुहूर्त आहे. यंदा गणेश चतुर्थी बुधवारी आहे आणि बुधवार हा दिवस श्री गणेशाला समर्पित असतो. त्यामुळे यंदाच्या गणेश चतुर्थीचे महत्त्व आणखी वाढले आहे.
ADVERTISEMENT