मुंबईत गणपती विसर्जनावेळी पाच मुले बुडाली; दोघांना वाचवण्यात यश

मुंबई तक

• 03:27 AM • 20 Sep 2021

लाडक्या गणरायाला रविवारी सर्वत्र निरोप देण्यात आला. मुंबईतही ठिकठिकाणी गणरायाचं विसर्जन करण्यात आलं. दरम्यान, गणेश विसर्जनावेळी पाच मुलं बुडाल्याची दुर्दैवी दुर्घटना घडली. यात दोन मुलांना वाचवण्यात यश आलं असून इतर तिघांचा शोध घेतला जात आहे. मुंबईसह संपूर्ण राज्यात रविवारी गणरायाला निरोप देण्यात आला. दरम्यान गणपती विसर्जनादरम्यान मुंबईसह राज्यात काही ठिकाणी विसर्जनाला गालबोट लावणाऱ्या घटना घडल्या […]

Mumbaitak
follow google news

लाडक्या गणरायाला रविवारी सर्वत्र निरोप देण्यात आला. मुंबईतही ठिकठिकाणी गणरायाचं विसर्जन करण्यात आलं. दरम्यान, गणेश विसर्जनावेळी पाच मुलं बुडाल्याची दुर्दैवी दुर्घटना घडली. यात दोन मुलांना वाचवण्यात यश आलं असून इतर तिघांचा शोध घेतला जात आहे.

हे वाचलं का?

मुंबईसह संपूर्ण राज्यात रविवारी गणरायाला निरोप देण्यात आला. दरम्यान गणपती विसर्जनादरम्यान मुंबईसह राज्यात काही ठिकाणी विसर्जनाला गालबोट लावणाऱ्या घटना घडल्या आहेत.

मुंबईच्या वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर रात्री गणपती विसर्जनादरम्यान 5 मुले बुडाल्याची घटना घडली. यात दोन मुलांना वाचविण्यात स्थानिकाना यश आलं. तर उर्वरित तीन मुले बेपत्ता आहेत. पोलीस, महापालिका, अग्निशामक दल आणि तटरक्षक दलाकडून त्यांचा शोध घेतला जात आहे.

नेमकं काय घडलं?

अंधेरीच्या वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर गणपती विसर्जन केलं जात असताना रात्री 9 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. विसर्जन करत असताना 5 मुले समुद्रात खोल पाण्याच्या दिशेनं गेली. पुढे पुढे जात असताना मुलांना खोल पाण्याचा अंदाज आला नाही. अचानक पाचही मुले पाण्यामध्ये बुडायला लागली. ही घटना निदर्शनास येताच तेथील स्थानिक रहिवाशांनी धाव घेत त्यांना वाचवण्याचे प्रयत्न केले. यात दोघांना वाचवण्यात यश आलं. त्या दोघांवर कूपर रुग्णालयात उपचार केले जात आहेत.

राज्यात इतर ठिकाणीही विसर्जनाला गालबोट…

पुणे जिल्ह्यात विसर्जनादरम्यान दोन मुले बुडाली. मोशी आळंदी रोडवरील इंद्रायणी नदीपात्रात गणपतींचे विसर्जन सुरू असताना दोन मुले बुडाली. दत्ता ठोंबरे (वय 20) आणि प्रज्वल काळे (वय 18) अशी या मुलांची नावं आहेत.

अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे येथे 17 वर्षीय अरमान पठाण या मुलाचा बासलापूर तलावामध्ये बुडून मृत्यू झाला. पोहत असताना त्याचा गाळात पाय फसला आणि तो बुडाला. काका आणि इतर दोन भाऊ त्याला वाचवताना गाळात फसले. पण, विसर्जनासाठी आलेल्या नागरिकांनी त्यांना बाहेर काढलं. अरमानला मात्र वाचवू शकले नाही.

    follow whatsapp