वायू गळतीमुळे बदलापुरात खळबळ, परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात यश

मुंबई तक

• 02:03 AM • 04 Jun 2021

ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरात गुरुवारी रात्री दहा वाजल्याच्या दरम्यान MIDC परिसरातील एका कंपनीत वायू गळती झाल्यामुळे शहरात चिंतेचं वातावरण पसरलं होतं. बदलापूर पूर्वेकडील शिरगाव, आपटेवाडी, दत्तवाडी, कात्रप, गावदेवी मंदीर या भागातील लोकांना या वायूगळतीचा त्रास सहन करावा लागला. या संपूर्ण भागात वायूचं साम्राज्य पसरलं होतं, ज्यामुळे लोकांना श्वसनाचा त्रास, डोळे चुरचुरणे, डोकं दुखणे, मळमळणे असा […]

Mumbaitak
follow google news

ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरात गुरुवारी रात्री दहा वाजल्याच्या दरम्यान MIDC परिसरातील एका कंपनीत वायू गळती झाल्यामुळे शहरात चिंतेचं वातावरण पसरलं होतं. बदलापूर पूर्वेकडील शिरगाव, आपटेवाडी, दत्तवाडी, कात्रप, गावदेवी मंदीर या भागातील लोकांना या वायूगळतीचा त्रास सहन करावा लागला.

हे वाचलं का?

या संपूर्ण भागात वायूचं साम्राज्य पसरलं होतं, ज्यामुळे लोकांना श्वसनाचा त्रास, डोळे चुरचुरणे, डोकं दुखणे, मळमळणे असा त्रास झाला. रात्री दहा वाजल्याच्या दरम्यान ग्लोबल इंटरमि़डीएट प्रायव्हेट लिमीटेड या कंपनीत वायूगळतीला सुरुवात झाली. जनावरांचं खाद्य बनवण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची प्रक्रीया या कंपनीत केली जाते. यावेळी कच्च्या तेलावर प्रक्रीया केली जात असताना सल्फरचं प्रमाण जास्त झाल्यामुळे ही वायूगळती झाल्याची माहिती स्थानिक अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

या वायूगळतीचं प्रमाण इतकं मोठं होतं की काही लोकांच्या घरात वायू शिरल्यामुळे त्यांना रस्त्यावर यावं लागलं. कर्जतच्या दिशेने जाणारा महामार्गही या वायुगळतीमुळे दिसत नव्हता. या घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी जात परिस्थिती नियंत्रणात आणली.

    follow whatsapp