Viral Video : बुलेटच्या पेट्रोल टाकीवर मुलगी, मागे ड्रायव्हर… रोमान्सचा व्हिडिओ व्हायरल

मुंबई तक

• 10:24 AM • 08 Mar 2023

Viral Video : राजस्थान : ‘बुलेटच्या पेट्रोल टाकीवर बसलेली मुलगी आणि तिच्या मागे गाडी चालवत असलेला तरुण’ असा प्रेमी युगुलाचा रोमान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ राजस्थानमधील जयपूर शहरातील जवाहर सर्कल चौकातील आहे. गाडीवर बसलेले दोघेही होळीच्या रंगात रंगलेले दिसून येत आहेत. ते दोघे बाईकवर एकमेकांना मिठी मारत आहेत. (A video […]

Mumbaitak
follow google news

Viral Video :

हे वाचलं का?

राजस्थान : ‘बुलेटच्या पेट्रोल टाकीवर बसलेली मुलगी आणि तिच्या मागे गाडी चालवत असलेला तरुण’ असा प्रेमी युगुलाचा रोमान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ राजस्थानमधील जयपूर शहरातील जवाहर सर्कल चौकातील आहे. गाडीवर बसलेले दोघेही होळीच्या रंगात रंगलेले दिसून येत आहेत. ते दोघे बाईकवर एकमेकांना मिठी मारत आहेत. (A video of a couple romancing a girl sitting on the petrol tank of Bullet and a young man driving behind her has gone viral on social media.)

यादरम्यान या जोडप्याने खुलेआम वाहतूक नियमांची पायमल्ली केल्याच दिसत आहे. यावेळी दोघांनीही हेल्मेट घातलं नव्हतं. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये हे प्रेमी युगुल ज्या बुलेटवरुन प्रवास करत आहे त्यावर राजस्थानचा नोंदणी क्रमांक आहे. हा व्हिडिओ आता पोलिसापर्यंत पोहोचला आहे. बुलेट बाईक चालकाचा शोध घेतला जात आहे, त्याआधारे वाहतूक पोलीस कारवाई करणार आहेत. यापूर्वीही असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

अजमेरमध्येही असाच प्रकार समोर आला होता. त्यावेळी दोघे बाईकवर रोमान्स करताना दिसले होते. दोघेही एकमेकांना मिठी मारत होते. यानंतर क्रिस्टियन गंज पोलिस स्टेशनचे एसएचओ करण सिंह यांनी व्हिडिओच्या आधारे गुन्हा दाखल केला होता. एसएचओ करण सिंह यांनी सांगितल होतं की, बाईकस्वार हा २४ वर्षीय तरुण आहे, ज्या मुलीला त्याने बाईकवर मिठी मारली ती अल्पवयीन असल्याचे होती.

    follow whatsapp