बीड: ’50 लाख रुपये द्या, अन्यथा मंदिर आरडीएक्सने उडवू’, पुन्हा एक धमकीचं पत्र

मुंबई तक

• 12:00 PM • 28 Nov 2021

रोहिदास हातागळे, बीड भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी 5व्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग असलेल्या परळी येथील प्रभू वैद्यनाथाचे मंदिर बॉम्ब लावून उडवून देऊ अशी धमकी मिळाल्याने परळी शहरात एकच खळबळ उडाली होती. शुक्रवार (26 नोव्हेंबर) रोजी वैद्यनाथ देवल कमिटीचे विश्वस्त यांच्या नावाने धमकीचे पत्र आले होते. त्यानंतर अंबाजोगाई येथे योगेश्वरी देवल कमिटीला मुख्य विश्वस्तांच्या नावाने पत्र आल्याने खळबळ उडाली […]

Mumbaitak
follow google news

रोहिदास हातागळे, बीड

हे वाचलं का?

भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी 5व्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग असलेल्या परळी येथील प्रभू वैद्यनाथाचे मंदिर बॉम्ब लावून उडवून देऊ अशी धमकी मिळाल्याने परळी शहरात एकच खळबळ उडाली होती. शुक्रवार (26 नोव्हेंबर) रोजी वैद्यनाथ देवल कमिटीचे विश्वस्त यांच्या नावाने धमकीचे पत्र आले होते. त्यानंतर अंबाजोगाई येथे योगेश्वरी देवल कमिटीला मुख्य विश्वस्तांच्या नावाने पत्र आल्याने खळबळ उडाली आहे.

पत्रात नेमकं काय म्हटलंय?

अंबाजोगाईच्या योगेश्वरी मंदिराला आरडीएक्सने उडवण्याची धमकीचे पत्र मिळाल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे. ‘आपण फार मोठ्या मंदिर संस्थानचे विश्वस्त आहात. आतापर्यंत आपल्या मंदिराला भरमसाठ देणगी रुपाने रक्कम मिळाली आहे. मी फार मोठा नामी गुंड, ड्रग माफिया आहे. मला खाजगी व महत्वाच्या कामासाठी 50 लाख रुपयांची गरज आहे.’

‘हे पत्र मिळताच पत्त्यावर रक्कम पोहोच करावी, अन्यथा मी योगेश्वरी मंदिर माझ्याकडील आरडीएक्सने उडवीन.’ , असे धमकी देणारं पत्र कथिम ड्रग्स माफियाने अंबाजोगाईच्या देवल कमेटीला पाठवलं असल्याचं समजतं आहे.

दरम्यान, असे पत्र महाराष्ट्रात बऱ्याच मंदिरांना पाठविले असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

अंबाजोगाईच्या योगेश्वरी मंदिराला हे पत्र प्राप्त होताच देवल कमिटीचे सचिव अॅड. शरद लोमटे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. संस्थानच्या तक्रारीवरुन शहर ठाण्यात आरोपी प्रभाकर नामदेव पुंड (रा.पिंपळगाव,जि.नांदेड) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या तक्रारीनंतर पोलिसांनी मंदिराला भेट देऊन संपूर्ण मंदिराची पाहणी केली.

धमकीचं पत्र मिळाल्यानंतर मंदिराच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात यावा अशी मागणी देवल कमिटीचे सचिव शरद लोमटे यांनी केली आहे.

परळीच्या विश्वस्तांनाही धमकीचं पत्र

परळीच्या वैद्यनाथ मंदिरापाठोपाठ अंबाजोगाईच्या योगेश्वरी मंदिराला देखील असे धमकीचे पत्र प्राप्त झाल्याने पोलिसांनी आता या प्रकरणी कसून तपास सुरु केला आहे.

देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक प्रभू वैद्यनाथाचे मंदिर परळी येथे आहे. या मंदिराच्या दर्शनासाठी राज्य व परराज्यातून लाखो भाविक येतात. संस्थानच्या तक्रारीवरुन शहर ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पोलिसांनी मंदिराची सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.

बीड : ’50 लाख रुपये द्या, अन्यथा वैद्यनाथ मंदिर बॉम्बने उडवेन’; विश्वस्तांना धमकी

मार्च 2020 पासून हे मंदिर कोरोना बंद ठेवण्यात आले होते. महिनाभरापूर्वी मंदिरे उघडण्याचा निर्णय झाल्याने हे मंदिर भाविकांसाठी खुले झाले. यामुळे आता भाविकांची गर्दी होऊ लागली आहे. शुक्रवारी वैद्यनाथ मंदिर सचिव राजेश देशमुख हे मंदिरात आले असताना टपालाद्वारे आलेली पत्रे ते पाहत होते.

यातील एक पत्र व्यंकट गुरुपद मठपती (स्वामी) या नावाने आले होते. ते त्यांनी वाचून पाहिले अन् त्यांना धक्काच बसला. कारण या पत्रात 50 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. तसेच हे पैसे न दिल्यास मंदिर आरडीएक्सने उडवून देण्याचीही धमकी देण्यात आली होती. रतनसिंग रामसिंग दख्खने, रा. काळेश्वर नगर, विष्णूपुरी, नांदेड या पत्त्यावरुन हे पत्र आले होते. जे आता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

    follow whatsapp