Gram panchayat Result: पुतण्या पुन्हा काकांवर भारी! संदीप क्षीरसागरांची बाजी

मुंबई तक

20 Dec 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:24 AM)

बीड : तीन वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीत काका आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव केल्यानंतर पुतण्या संदीप क्षीरसागर काकांवर पुन्हा एकदा भारी ठरले आहेत. नवगन राजुरी जिल्हा परिषद सर्कल मधील नवगण राजुरी या होमपीचवर जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव करत संदीप क्षीरसागर यांच्या गटाची एकहाती सत्ता आली आहे. राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर आणि जयदत्त क्षीरसागर या […]

Mumbaitak
follow google news

बीड : तीन वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीत काका आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव केल्यानंतर पुतण्या संदीप क्षीरसागर काकांवर पुन्हा एकदा भारी ठरले आहेत. नवगन राजुरी जिल्हा परिषद सर्कल मधील नवगण राजुरी या होमपीचवर जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव करत संदीप क्षीरसागर यांच्या गटाची एकहाती सत्ता आली आहे.

हे वाचलं का?

राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर आणि जयदत्त क्षीरसागर या काका-पुतण्यातील सत्तासंघर्ष ग्रामपंचायत निवडणुकीतही पहावयास मिळाला. नवगन राजुरी जिल्हा परिषद सर्कलमधील नवगण राजुरी या होमपीचवर जयदत्त क्षीरसागर यांच्या गटाचा धुव्वा उडवत संदिप क्षीरसागर यांनी काकांना धोबीपछाड दिला. या सर्कलमधील चार ग्रामपंचायती आमदार क्षीरसागर यांच्या ताब्यात आल्या आहेत.

धनशक्ती विरुद्ध जनशक्तीमध्ये जनशक्तीचा विजय झाला. फक्त मुंबईत राहून ग्रामपंचायत निवडणुका जिंकता येत नाहीत. त्याला जनतेत उतरावं लागतं, असं म्हणतं संदीप क्षीरसागर यांनी जयदत्त क्षीरसागर यांना टोला लगावला. तसंच राजुरी मतदारसंघातील पहिल्या फेरीत सर्वच ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात आल्या आहेत. तालुक्यासह जिल्ह्यातील सर्वात जास्त ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्याच आहेत, असा विश्वास आमदार संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केला.

मागील पाच-सात वर्षांपासून संदिप क्षीरसागर आणि जयदत्त क्षीरसागर यांच्यातील सत्ता संघर्ष महाराष्ट्राने पाहिला आणि अभुवला आहे. ५ वर्षापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार क्षीरसागरांनी नवगण राजुरीच्या ग्रामपंचायतीवर आपला झेंडा फडकवला होता. त्याच निकालाची पुनरावृत्ती पुन्हा एकदा त्यांनी केली.

जयदत्त क्षीरसागर यांचे होमग्राउंड असणाऱ्या राजुरीमध्ये आमदार क्षीरसागर यांच्या पॅनलचा मोठा विजय झाला आहे. त्यासोबत उमरद जहागीर, लिंबारुई, दगडी शहजाणपूर या ग्रामपंचायती देखील आमदार क्षीरसागर यांच्या ताब्यात आल्या आहेत.

    follow whatsapp