कुलर ठरला किलर? नाशिकमध्ये आजोबा आणि नातू यांचा मृत्यू

मुंबई तक

29 Apr 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 09:09 AM)

प्रवीण ठाकरे, प्रतिनिधी, नाशिक कुलरच्या हवेतून किटकनाशकचा द्रव पसरल्यामुळे आजोबा आणि नातवाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. आजोबा आणि नातवाचा मृत्यू नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला याचे कारण शोधण्यासाठी नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. ही घटना नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील महड या गावांमध्ये घडली आहे. घरासमोर थुंकल्याचा राग, अल्पवयीन मुलाचा गळा दाबून खून; आरोपी […]

Mumbaitak
follow google news

प्रवीण ठाकरे, प्रतिनिधी, नाशिक

हे वाचलं का?

कुलरच्या हवेतून किटकनाशकचा द्रव पसरल्यामुळे आजोबा आणि नातवाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. आजोबा आणि नातवाचा मृत्यू नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला याचे कारण शोधण्यासाठी नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. ही घटना नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील महड या गावांमध्ये घडली आहे.

घरासमोर थुंकल्याचा राग, अल्पवयीन मुलाचा गळा दाबून खून; आरोपी अटकेत

बागलाण तालुक्यातील महड येथे जीभाऊ सोनवणे यांचा शेतात राहत होते. दिवसभराच्या कामानंतर कुटुंब रात्रीचे जेवण आटोपून झोपण्यासाठी गेले. आजी, आजोबा, नातू आणि आणखी एकजण कुलरच्या थंडगार हवेत खोलीत झोपले. कुटुंबातील इतर सदस्य घराबाहेर मोकळ्या हवेत झोपले. सकाळी खोलीत झोपलेल्या चौघांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नंतर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.

या चौघांना नेमका काय त्रास झाला, कशामुळे अस्वस्थ वाटू लागले याचे निदान होत नसल्यामुळे त्यांना गावाकडून नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, उपचारादरम्यान नातवाचा मृत्यू झाला आजोबांचा उपचार सुरु असतांना मृत्यू झाला. यापैकी आजी व अन्य एकजण व्हेंटिलेटरवर असून नाशिक जिल्हा रुग्णालयात ते अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे.

वैद्यकीय पथकाने घटनास्थळी येवून सर्व वस्तुंचे नमूने तपासून पाहिले आहेत. या तपासात रात्री जे कुलर सुरु करण्यात आले होते. त्या कुलरच्या जवळ शेतीपिकांवर फवारणी करावी लागणारी विषारी औषधे व नायट्रोजनयुक्त रासायनिक खत ठेवलेले आढळून आले आहेत. कूलरमधील हवा कीटकनाशकांनी दूषित झाली असावी आणि खोलीच्या बंद दरवाजामुळे खोलीतील नायट्रोजनची पातळी वाढली असावी, असा प्राथमिक अंदाज बागलाण तालुक्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही.

Crime: डॉक्टर प्रियंकाची आत्महत्या नाही, तर डॉक्टर पतीनेच ‘यांच्या’ साथीने केली हत्या

या चौघांना काय झाले हे समजू शकले नाही. वैद्यकीय पथकाने घटनास्थळी येवून सर्व संशयास्पद वस्तुंचे नमूने तपासून पाहिले आहेत. या तपासात रात्री जे कुलर सुरु करण्यात आले होते. त्या कुलरच्याजवळ शेतीपिकांवर फवारणी करावी लागणारी विषारी औषधे आणि रासायनिक खत ठेवलेले आढळून आले आहेत. कूलरमधील हवा कीटकनाशकांनी दूषित झाली असावी आणि खोलीच्या बंद दरवाजामुळे खोलीतील नायट्रोजनची पातळी वाढली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. अशी माहिती बागलाण तालुक्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. या घटनेत आजोबांसह तीन वर्षांच्या नातवाचा मृत्यू झाला. याबाबत संपूर्ण बागलाण तालुक्यात तर्कविर्तकांना उत आले आहे.

    follow whatsapp