भारतात कोरोनाचा कहर वाढतो आहे. कोव्हिड 19 चे रूग्ण वाढत आहेत. याबाबत आता पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने चिंता व्यक्त केली आहे. भारतात कोरोना संकट गहिरं होत चाललं आहे. कोरोनाने तिथे अक्राळविक्राळ रूप धारण केलं आहे. सगळ्या जगाने आता भारताला मदत करण्याची आवश्यकता आहे असं मत ग्रेटा थनबर्गने मांडलं आहे.
ADVERTISEMENT
नेमकं काय म्हणाली ग्रेटा थनबर्ग?
भारतात वाढत असलेला कोरोना पाहून मन विषण्ण झालं आहे. आता ग्लोबल कम्युनिटीने भारताला मदत करावी. कोरोनाशी लढा देण्यासाठी भारताला जे काही आवश्यक आहे ते सर्व सहकार्य करावं असं ग्रेटाने म्हटलं आहे. भारतात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णसंख्येत वाढ होते आहे. दुसऱ्या लाटेत कोरोनाने कहर माजवला आहे. अशात आता ग्रेटा थनबर्गने या परिस्थितीविषयी चिंता व्यक्त केली आहे.
Corona संक्रमणाची साखळी कशी तोडता येईल? दुसरी लाट कधी संपेल?
गेल्या काही दिवसांमध्ये देशात तीन लाखांपेक्षा जास्त रूग्ण पॉझटिव्ह आढळले आहेत. रूग्णालयात बेड उपलब्ध नाहीत आणि ऑक्सिजनची कमतरता भासते आहे अशा सगळ्या परिस्थितीत आता ग्रेटा थनबर्गचं ट्विट समोर आलं असून तिने भारतातल्या कोरोना स्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. भारतात दुसऱ्या लाटेमुळे आलेली कोरोनाची स्थिती ही मन सुन्न करणारी आहे असं ग्रेटाने म्हटलं आहे.
Corona ची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा वेगळी का ठरते आहे?
भारतात ऑक्सिजनची प्रचंड कमतरता भासते आहे. कोरोना रूग्णसंख्या वाढते आहे. कोरोना व्हायरसमध्ये म्युटंट आलं आहे त्यामुळे यावेळी कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वेगाने होतो आहे. कोरोनामुळे दिल्ली, महाराष्ट्र, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे. देशातल्या कोरोना परिस्थितीचा आढावा नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. देशातल्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी त्यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. देशात सर्वाधिक कोरोना रूग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात कोरोना रूग्णसंख्या वाढते आहे तसंच ऑक्सिजनचाही तुटवडा भासतो आहे. दिल्लीतही अशीच परिस्थिती आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं सकाळी ७ ते ११ या वेळेतच सुरू असतात.
भारतात शनिवारी 3 लाख 46 हजार पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. तर देशभरात 2624 लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतात मार्च महिन्याच्या मध्यापासून 25 हजारांपेक्षा जास्त कोरोना रूग्ण आढळत आहेत. दुसऱ्या लाटेने देशभरात कहर माजवला आहे. तसंच भारतात सक्रिय रूग्णांची संख्याही आता 25 लाखांच्या वर गेली आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवरही ताण पडतो आहे. या सगळ्या परिस्थितीवर आता ग्रेटा थनबर्गने चिंता व्यक्त केली आहे.
ADVERTISEMENT