Gujarat Assembly Election 2022 : राहुल गांधींनी फुंकले रणशिंग, मोदींच्या राज्यात केल्या 8 घोषणा

मुंबई तक

05 Sep 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 10:47 AM)

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (gujarat assembly election 2022) काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज ८ मोठ्या घोषणा केल्या. गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या सभेत राहुल गांधी यांनी केंद्रातील आणि गुजरातमधील भाजप सरकारला लक्ष्य केलं. गुजरातमध्ये सत्ता आल्यानंतर काँग्रेस काय करणार, याची घोषणा राहुल गांधींनी केली. गुजरात विधानसभेसाठी वर्षअखेरीस निवडणूक (gujarat assembly election 2022) होत आहे. त्यामुळे […]

Mumbaitak
follow google news

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (gujarat assembly election 2022) काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज ८ मोठ्या घोषणा केल्या. गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या सभेत राहुल गांधी यांनी केंद्रातील आणि गुजरातमधील भाजप सरकारला लक्ष्य केलं. गुजरातमध्ये सत्ता आल्यानंतर काँग्रेस काय करणार, याची घोषणा राहुल गांधींनी केली.

हे वाचलं का?

गुजरात विधानसभेसाठी वर्षअखेरीस निवडणूक (gujarat assembly election 2022) होत आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पक्ष अशी तिरंगी लढत बघायला मिळू शकते. दरम्यान, गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनंही लक्ष्य केंद्रीत केलं असून, राहुल गांधी यांनी आठ मोठ्या घोषणा करत निवडणुकीचं रणशिंग फुंकलं.

अहमदाबाद येथील सभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले, ‘गुजरात ड्रग्ज सेंटर बनलं आहे. मुंद्रा बंदरातून अमली पदार्थ नेले जातात. सरकार कोणतीही कारवाई करत नाही. हे गुजरात मॉडेल आहे. गुजरात ड्रग्जचं केंद्र बनलं असून, मुंद्रा बंदरातून सर्व ड्रग्ज बाहेर पडत आहे. इथलं सरकार त्याविरोधात का कारवाई करत नाही? मुंद्रा बंदरात अमली पदार्थ सापडतात, जे गुजरातच्या तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करत आहेत”, असं राहुल गांधी म्हणाले.

गुजरात विधानसभा निवडणूक 2022 : भाजपने दोन मंत्र्यांची खाती का काढून घेतली?

गुजरात विधानसभा निवडणूक 2022 : राहुल गांधींची मोदींवर टीका

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी आठ मोठ्या घोषणा केल्या. काँग्रेसचं सरकार आलं, तर ५०० रुपयात गँस सिलिंडर ते बेरोजगारांना भत्ता अशा घोषणा केल्या.

“आम्ही गुजरातमधील जनतेसाठी काम करू. भाजपाप्रमाणे फक्त २ ते ३ मित्रांसाठी काम करणार नाही. हा आमचा संकल्प असून, गुजरातची जनता काँग्रेसला विजयी करेल”, असं म्हणत राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि गुजरात सरकारवर निशाणा साधला.

गुजरात विधानसभा निवडणूक : “हिंदूंची मते मिळावीत म्हणून बिल्किसचे गुन्हेगार सोडले असतील तर…”

राहुल गांधी यांनी अहमदाबाद येथील सभेत केलेल्या घोषणा

– ५०० रुपयात गॅस सिलिंडर

– ३०० युनिटपर्यंत मोफत वीज

– १० लाखांपर्यंत उपचार मोफत

– शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंत कर्ज माफ करणार

– ३००० सरकारी इंग्लिश मीडियम शाळा सुरू करणार

– कोरोना पीडितांच्या कुटुंबियांना ४ लाखांची मदत

– दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना लिटरमागे प्रत्येकी ५ रुपये अनुदान

– सरकारी नोकऱ्यांमधील कंत्राटी पद्धत बंद करणार आणि बेरोजगारांना ३००० रुपेय भत्ता देणार

    follow whatsapp