सुशांत प्रकरणानंतर मुंबईला म्हटलं गेलं ड्रग्ज कॅपिटल, बघा 3000 किलो ड्रग्स जाणार होतं कुठे?

मुंबई तक

• 10:10 AM • 30 Sep 2021

नवी दिल्ली: गुजरातमधील मुंद्रा बंदरात अलीकडेच 3000 किलो अंमली पदार्थ (ड्रग्स) जप्त करण्यात आलं होतं. 30 क्विंटल ड्रग्स एवढा प्रचंड माल जप्त केल्यानंतर महसूल गुप्तचर संचालनालय (DRI)या संपूर्ण तपासात सक्रिय झालं होतं. डीआरआयने आता या प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. डीआरआयने दिल्ली आणि नोएडा येथे छापे टाकून दोघांना अटक केली आहे. डीआरआय लखनौ आणि नोएडा […]

Mumbaitak
follow google news

नवी दिल्ली: गुजरातमधील मुंद्रा बंदरात अलीकडेच 3000 किलो अंमली पदार्थ (ड्रग्स) जप्त करण्यात आलं होतं. 30 क्विंटल ड्रग्स एवढा प्रचंड माल जप्त केल्यानंतर महसूल गुप्तचर संचालनालय (DRI)या संपूर्ण तपासात सक्रिय झालं होतं. डीआरआयने आता या प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. डीआरआयने दिल्ली आणि नोएडा येथे छापे टाकून दोघांना अटक केली आहे. डीआरआय लखनौ आणि नोएडा युनिट्सने दोन जणांना अटक केली आहे. जे अफगाणिस्तानचे नागरिक असल्याचं समजतं आहे.

हे वाचलं का?

दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह याच्या मृत्यू प्रकरणानंतर ड्रग्सचा मुद्दा बराच चर्चेत आला होता. त्यावेळी मुंबई म्हणजे ‘ड्रग कॅपिटल’ असं देखील चित्र निर्माण केलं जात होतं. पण आता गुजरातमधील मुंद्र बंदरावर जे 3000 किलो एवढं प्रचंड ड्रग्स सापडलं आहे ते मुंबईत नव्हे तर थेट राष्ट्रीय राजधानी दिल्ली जाणार होतं. अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

गुजरातमधील मुंद्रामध्ये 3000 किलो ड्रग्स ते शिमलातून अटक व्हाया दिल्ली

मिळालेल्या माहितीनुसार, हे अफगाण नागरिक मुंद्रा बंदरातून दिल्लीला ड्रग्स पोहचविण्यातील महत्त्वाचा दुवा होते. या दोघांनाही शिमला येथून अटक करण्यात आली आहे. डीआरआयने मुंद्रा बंदरावर जी कारवाई केली त्यानंतर दिल्लीतून 10 किलो कोकेन, 11 किलो हेरॉईन आणि 38 किलो इतर अंमली पदार्थ जप्त केले आहेत.

यावेळी देखील दोन अफगाणी नागरिक आणि एका उझबेकिस्तानच्या महिलेला अटक केली होती. या तिघांच्या अटकेनंतर डीआरआयने आता आणखी दोन अफगाण नागरिकांना शिमलामधील हॉटेलमधून अटक केली आहे. हे दोघेही या संपूर्ण गुन्ह्यातील प्रमुख गुन्हेगार असल्याचं म्हटलं जात आहे.

अटक केलेले दोन्ही अफगाणी नागरिक हे भारतातील ड्रग्स पुरवठा साखळीचे मुख्य सूत्रधार होते. जेव्हा दिल्लीत याप्रकरणी छापेमारीचं प्रमाण वाढलं तेव्हा हे दोन्ही अफगाण नागरिक एका कारने शिमल्याला पळून गेले. ते शिमल्यातील एका हॉटेलमध्ये अनेक दिवस लपून राहिले होते.

पकडलेल्या दोन अफगाणी नागरिकांपैकी महमूद हा सर्वात महत्त्वाचा दुवा असल्याचे म्हटले जात आहे. जो गेल्या सात वर्षांपासून नोएडामध्ये आपल्या साथीदारासह भाड्याच्या घरात राहत होता.

मुंद्रा बंदरात जप्त करण्यात आलेले ड्रग्स हे दिल्लीला शिमला येथून अटक करण्यात आलेल्या दोन्ही अफगाण नागरिकांमार्फत दिल्लीत पोहचवली जाणार होती. या पुरवठा साखळीचे पैसे हवालाद्वारे पोहचविण्यात येणार होते.

मिळालेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेले दोघेही अफगाणिस्तानच्या जलालाबादचे रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. ते भारतात उपचारासाठी येणाऱ्या अफगाण नागरिकांना मदत करायचे. डॉक्टर, हॉस्पिटल, औषधांपासून ते त्यांच्याकडे कुठे राहायचे याची व्यवस्था करायचे.

याच्याच आडून ते अफगाणिस्तानातून आलेले ड्रग्स हे दिल्लीमध्ये दुसऱ्या पुरवठादाराकडे नेण्याचे काम करत होते. दिल्लीतून पकडलेल्या पुरवठादारामार्फतच हॉटेल्स, शाळा आणि महाविद्यालयात ड्रग्स पुरवले जात होते.

Sushant Singh: सुशांत सिंह प्रकरणात मुंबई पोलीसच खरे ठरले?

दरम्यान, शिमलाहून पकडलेल्या दोन्ही अफगाणी आरोपींची रवानगी नोएडा तुरुंगात करण्याता आली आहे. असं म्हटले जात आहे की, त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे डीआरआय आणखी काही लोकांना अटक करु शकते.

    follow whatsapp