Shivsena Bhavan कधी फोडणार सांगा, मग आम्ही… गुलाबराव पाटील यांचं भाजपला आव्हान

मुंबई तक

• 09:37 AM • 01 Aug 2021

भाजप नेते प्रसाद लाड यांनी वेळ पडली तर सेना भवन फोडू अशा प्रकारचं विधान केले आहे. या विधानाला राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सडेतोड उत्तर देताना म्हटल आहे की माझं आव्हान आहे तुम्हाला तुम्ही सेना भवन कधी फोडणार याची तारीख आणि वेळ कळवा आम्ही तुमचं काय फोडू हे तुमच्या लक्षात येईल असं खुलं […]

Mumbaitak
follow google news

भाजप नेते प्रसाद लाड यांनी वेळ पडली तर सेना भवन फोडू अशा प्रकारचं विधान केले आहे. या विधानाला राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सडेतोड उत्तर देताना म्हटल आहे की माझं आव्हान आहे तुम्हाला तुम्ही सेना भवन कधी फोडणार याची तारीख आणि वेळ कळवा आम्ही तुमचं काय फोडू हे तुमच्या लक्षात येईल असं खुलं आव्हान गुलाबराव पाटील यांनी दिलं आहे.

हे वाचलं का?

भाजप सेनेची युती तुटल्यानंतर सेना महाविकास आघाडीत सहभागी झाली आहे हे सरकार पडेल असे भाजपला वाटत होत मात्र सरकार पडत नसल्याने कोणत्याही मार्गाने आता वातावरण विस्कळीत करण्याचा त्यांचा हा प्रयत्न त्यातूनच हे अशा प्रकारचे वक्तव्य त्यांच्या कडून केली जात आहेत, प्रसाद लाड यांच्यासारख्या व्यापारी असलेल्या माणसाला अशा प्रकारचे बोलणे शोभत नाही,त्यांनी हिंमत असेल तर हा प्रयोग करून बघावा मगं कळेल त्यांना काय होत ते अशा शब्दात लाड यांना प्रत्युत्तर दिले आहे

कोकणातील पूरग्रस्तांना मदत करण्यावरून गिरीश महाजन यांनीही आज आघाडी सरकार वर टीका केली होती हे सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे,लोक अतिशय बिकट परिस्थिती चा सामना करीत असताना ही मदतीची घोषणा करायला तयार नाही ,ही दुर्दैवी गोष्ट आहे ,विरोधी पक्षाचे नेते पूरग्रस्त भागाचे दौरे करीत आहेत म्हणून हे सुध्दा दौरे करीत असल्याची टीका केली होती

महाजन यांच्या टीकेला उत्तर देताना गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे की, ही वेळ राजकारण करण्याची नाही,माणूसकी जपण्याची वेळ आहे,पंचनामे अद्याप पूर्ण झाले नाहीत म्हणून दहा हजारांची तातडीची मदत सरकारने जाहीर केली आहे. पंचनामे पूर्ण झाले की कॅबिनेट मध्ये ठोस पॅकेज देण्याचा निर्णय घेतला जाईल

गिरीश महाजन यांना वरूनच असा आदेश असू शकतो की त्यांनी फक्त बोलावे, जामनेर मधून तुम्ही कोकणात गेले त्या बद्दल अभिनंदन आहे मात्र जामनेर कडे ही लक्ष द्या त्या ठिकाणी काय मदत लागते ते तुम्हाला कळेल असाही टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला.

    follow whatsapp