शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानावर झालेल्या हल्लाप्रकरणात मुंबई पोलिसांनी गुणरत्न सदावर्ते यांना शुक्रवारी अटक केली होती. त्यानंतर त्यांना आज मुंबई सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, या प्रकरणात अटक केलेल्या इतर १०९ जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शुक्रवारी (८ एप्रिल) संपकरी एसटी कर्मचाऱ्यांच्या एका गटाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन आंदोलन केलं. अचानक सिल्व्हर ओक येथे धडकलेल्या कर्मचाऱ्यांनी दगडफेक आणि चपला भिरकावल्यानं गोंधळ निर्माण झाला होता. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी शुक्रवारी रात्री गुणरत्न सदावर्ते यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर रात्री त्यांना अटक करण्यात आली.
न्यायालयात काय घडलं?
मुंबई पोलिसांनी आज सदावर्तेंसह इतर आरोपींना न्यायालयासमोर हजर केले. यावेळी प्रदीप घरत यांनी सरकारच्या वतीने, तर महेश वासवानी यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या वतीने युक्तिवाद केला. सरकारी वकिलांनी सुरुवातीलाच गुणरत्न सदावर्ते कालच अटक केली असून, १४ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी केली. “गुणरत्न सदावर्ते यांनी आंदोलकांना चिथावणी दिली. आम्ही शरद पवारांच्या घरात घुसून जबाब विचारू असं सदावर्त म्हणाले होते,” असं वकिलांनी न्यायालयात सांगितलं.
त्यावर “आपल्याला किती आरोपींची पोलीस कोठडी हवी आहे”, असा प्रश्न न्यायालयाने विचारला होता. “सर्वच आरोपींची कोठडी हवी,” असं सरकारी वकिलांनी सांगितलं. “सदावर्ते यांनी आझाद मैदानात भाषण करताना भडक विधानं केली होती. त्याचबरोबर आदोलकांना मोर्चा काढण्यासही सांगितलं होतं. आम्ही सदावर्तेंच्या त्या भाषणाची प्रतही सादर करतो. अजित पवारांच्याविरुद्धही भाषण केलं गेलं होतं,” असंही सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितलं.
यावेळी सदावर्ते यांचे वकील म्हणाले की, “माझ्या अशिलांनी (गुणरत्न सदावर्ते) चिथावणीखोर भाषण केल्याचा दावा मुंबई पोलिसांकडून केला जात आहे. मी सरकारी पक्षाला आव्हान देतो की, शरद पवारांच्या घरात घुसून जबाब मागू असं माझ्या अशीलांनी म्हटल्याचं सिद्ध करून दाखवावं. क्लिपही दाखवावी. जर ते सिद्ध करत असतील, तर मी जमानत नाही घेणार. ज्यावेळी हल्ला झाला, त्यावेळी माझे अशील दुसरीकडे होते. एका पत्रकाराने त्यांना घटनेची माहिती दिली. या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी. काल अशीला,” असा युक्तिवाद गुणरत्न सदावर्ते यांच्या वकिलांनी केला.
ADVERTISEMENT