महाबळेश्वरमध्ये तुफान गारपीट, स्थानिकांसह नागरिकांचं रस्त्यावर स्केटिंग

मुंबई तक

• 03:21 PM • 24 Mar 2021

इम्तियाज मुजावर, महाबळेश्वर – महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये आज दुपारी अचानक ढगांच्या गडगडाटासह गारांचा मुसळधार पाऊस पडला. ढगांच्या गडगडाटासह विजेच्या कडकडाटामुळे या परिसरातलं वातावरण पूर्णपणे बदलून गेलं. गारांचा पाऊस पडल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा बर्फाची चादर अंथरल्याचं चित्र तदयार झालं होतं. पर्यटनासाठी महाबळेश्वरमध्ये आलेल्या पर्यटकांची मात्र यावेळी चांगलीच चंगळ झालेली पहायला मिळाली. स्थानिकांसह पर्यटकांनी […]

Mumbaitak
follow google news

इम्तियाज मुजावर, महाबळेश्वर –

हे वाचलं का?

महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये आज दुपारी अचानक ढगांच्या गडगडाटासह गारांचा मुसळधार पाऊस पडला. ढगांच्या गडगडाटासह विजेच्या कडकडाटामुळे या परिसरातलं वातावरण पूर्णपणे बदलून गेलं. गारांचा पाऊस पडल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा बर्फाची चादर अंथरल्याचं चित्र तदयार झालं होतं.

पर्यटनासाठी महाबळेश्वरमध्ये आलेल्या पर्यटकांची मात्र यावेळी चांगलीच चंगळ झालेली पहायला मिळाली. स्थानिकांसह पर्यटकांनी रस्त्यावर पडलेल्या बर्फावर स्केटिंगचा आनंद घेतला. सुमारे दोन तास महाबळेश्वर भागात मुसळधार पाऊस पडला, ज्यामुळे अनेक सखळ भागांमध्ये पाणी साचलेलं पहायला मिळालं. अचानक आलेल्या या पावसामुळे वेणा नदीच्या पातळीतही वाढ झालेली पहायला मिळाली.

परंतू अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांसह पर्यटकांना एक वेगळाच अनुभव आला. रस्त्यावर पडलेल्या गारा दूर करत पर्यटक गाडीने पुढे जाताना दिसत होते. यावेळी स्थानिक लहानग्यांनी गारा एकमेकांवर फेकून अचानक आलेल्या या गारपिटीचा आनंद घेतला.

    follow whatsapp