मुंबईतील Haji Ali दर्ग्याची लसीकरण केंद्रासाठी जागा देण्याची तयारी

मुस्तफा शेख

• 04:01 PM • 02 Jun 2021

मुंबईतल्या सुप्रसिद्ध हाजी अली दर्गा लसीकरण केंद्रासाठी खुली जागा देण्यास तयार आहे. हाजी अली दर्ग्याचे विश्वस्त कोव्हिड 19 च्या प्रतिबंधक लसीसाठी जागा देण्यास तयार आहे. एवढंच नाही तर माटुंगा येथील मशिदीच्या विश्वस्तांनी, माहिम कब्रस्तान आणि ग्रीन बॉम्बे स्कूल या ठिकाणीही लसीकरण सुरू करण्याची तयारी आहे. मुंबई महापालिकेच्या उत्तराची आता वाट पाहिली जाते आहे जेणेकरून ते […]

Mumbaitak
follow google news

मुंबईतल्या सुप्रसिद्ध हाजी अली दर्गा लसीकरण केंद्रासाठी खुली जागा देण्यास तयार आहे. हाजी अली दर्ग्याचे विश्वस्त कोव्हिड 19 च्या प्रतिबंधक लसीसाठी जागा देण्यास तयार आहे. एवढंच नाही तर माटुंगा येथील मशिदीच्या विश्वस्तांनी, माहिम कब्रस्तान आणि ग्रीन बॉम्बे स्कूल या ठिकाणीही लसीकरण सुरू करण्याची तयारी आहे. मुंबई महापालिकेच्या उत्तराची आता वाट पाहिली जाते आहे जेणेकरून ते या ठिकाणी व्यवस्था करू शकतील.

हे वाचलं का?

मुंबईत खासगी हॉस्पिटल सोसायट्यांमध्ये करणार लसीकरण

आम्ही हाजी अली दर्ग्याचा परिसर लसीसकरणासाठी उपलब्ध असल्याचं पत्र लिहून मुंबई महापालिकेला कळवलं आहे. या ठिकाणी खुल्या जागेत लसीकरण सुरू करता येईल असं आम्ही मुंबई महापालिकेला सांगितलं आहे. धार्मिक स्थळांच्या खुल्या जागांमध्ये जर लसीकरण सुरू झालं तर आम्ही जास्तीत जास्त लोकांना लस घेण्यासाठी उद्युक्त करता येईल. असंही हाजी अली दर्ग्याच्या विश्वस्तांनी म्हटलं आहे.

४५ वर्षांवरील सर्व व्यक्तींचं लसीकरण पूर्ण, महाराष्ट्रातलं हे गाव ठरतंय देशासाठी आदर्श

अनेक ठिकाणी स्थानिक प्रतिनिधी हे लसीकरण सुरू करण्यासाठी जागा शोधत आहेत. मोठी आणि मोकळी जागा शोधून त्या ठिकाणी लसीकरण सुरू करणं हा देखील लसीकरण मोहिमेचाच एक भाग आहे. फक्त हाजी अली दर्गाच नाही तर मुंबईतल्या अनेक धार्मिक स्थळांनी त्यांच्या धार्मिक स्थळांचा परिसर लसीकरणासाठी उपलब्ध करून दिला आहे. धारावीमध्ये अनेक तरूण जोडप्यांना आम्ही लसीकरण करून घ्या हे आवाहन केलं. त्याचा आम्हाला फायदा झाला, मात्र 18 ते 44 वर्षे यांच्यासाठी लसीकरण तूर्तास बंद ठेवण्यात आलं आहे. मात्र आई वडिलांनी लस घेतली असेल तर त्यांची मुलंही सुरक्षित राहतील हा आमचा उद्देश होता त्यामुळे आम्ही धारावीत अनेकांचं लसीकरण करून घेतलं असं धारावीचे नगरसेवक बाबू खान यांनी सांगितलं आहे.

दरम्यान यााधी मुंबईतल्या मंदिरांमध्ये आणि चर्चमध्ये लसीकरण सुरू झालं आहे. जे धार्मिक स्थळांना भेट देतात तिथे त्यांना लसही उपलब्ध होते आहे. जे लोक मंदिरांमध्ये गेल्यावर्षी येऊ शकले नाहीत किंवा धार्मिक स्थळी येऊ शकले नाहीत त्यांनाही या ठिकाणी लस मिळू शकते आहे. याच अनुषंगाने आम्ही हाजी अली दर्ग्याचा परिसरही लसीकरणासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे असं मोहम्मद अहमद ताहीर यांनी सांगितलं. मोहम्मद ताहीर हे हाजी अली दर्ग्याचे प्रशासकीय अधिकारी आहेत.

    follow whatsapp