आमची भूमिका स्पष्ट आहे. हनुमान जयंतीच्या शुभपर्वावर मी विनंती केली होती की हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हनुमान चालीसा म्हणावी. मात्र उद्धव ठाकरे यांनी हनुमान चालीसा वाचली नाही. उलट हनुमान चालीसा वाचण्याला विरोध दर्शवण्यात आला. आज जर बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी माझं स्वागत केलं असतं. उद्या सकाळी ९ वाजता आम्ही हनुमान चालीसा म्हणणार आहोत. कायदा, सुव्यवस्था सगळ्या गोष्टी पाळून आम्ही हनुमान चालीसा म्हणणार असं रवी राणा यांनी जाहीर केलं आहे.
ADVERTISEMENT
राज ठाकरेंच्या भाषणाचा इफेक्ट? हनुमान चालीसा पुस्तकांच्या विक्रीत 30-40 टक्क्यांनी वाढ
बाळासाहेब ठाकरे यांचे खरे शिवसैनिक असते तर आम्हाला कधीही कुणीही हनुमान चालीसा वाचण्यापासून अडवलं नसतं. आम्हाला हनुमान चालीसा म्हणण्यापासून का अडवलं जातं आहे? मला अडवणारे खरे शिवसैनिक नाहीत. ते महाविकास आघाडीचे कार्यकर्ते असावेत. कारण बाळासाहेब ठाकरेंचे खरे शिवसैनिक असते तर त्यांनी आम्हाला मुळीच अडवलं नसतं.
उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाचा आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा विसर पडला आहे. मातोश्रीच्या बाहेर आम्ही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होता, सगळ्या कायदेशीर बाबी पाळून शांततेच्या मार्गाने आम्ही हनुमान चालीसा वाचणार आहोत. आम्ही या निर्णयावर आम्ही ठाम आहोत. हनुमान चालीसा महाराष्ट्रात वाचण्यापासून आम्हाला का अडवलं जातं आहे? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हनुमान चालीसा वाचली नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्ही हनुमान चालीसा वाचणार आहोत असं रवी राणा यांनी सांगितलं आहे.
आणखी काय म्हणाले रवी राणा?
मला अमरावतीतच ताब्यात घेण्यात येणार होतं. आमच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. मी पोलिसांनाही विनंती करतो आहे. उद्या आमच्याकडून कायदा-सुव्यवस्था यांचं पालन करण्यात येऊन हनुमान चालीसा वाचण्यात येईल. मी आमच्या कार्यकर्त्यांनाही सांगतो आहे की उद्या हनुमान चालीसा वाचण्यासाठी मुंबईत येऊ नका. आम्ही शांतपणे हनुमान चालीसा वाचणार आहोत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून जी संकटं महाराष्ट्रावर येत आहेत त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे असंही रवी राणा यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाल्या नवनीत राणा?
आम्हाला हनुमान चालीसा म्हणण्यासाठी अडवलं जातं आहे हे तुम्ही सगळेच पाहात आहात. बरेच लोक बऱ्याच गोष्टी म्हणत आहेत. मात्र त्यांनी हनुमान चालीसा वाचण्यासाठी आवाहन केलं असतं तर बरं झालं असतं. मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारायचं आहे की ज्या दिवशी हनुमान जयंती होती त्या दिवशी तुम्ही हनुमान चालीसा वाचली नाही. एवढंच नाही तर मंदिरातही गेला नाहीत. असं तुम्ही का बरं वागलात? आपल्या महाराष्ट्रावर अनेक संकटं कोसळली आहेत. लोड शेडिंगचं एवढं मोठं संक आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे, शेतकरी, शेतमजूरांचा प्रश्न आहे त्यावरही काही बोलत नाही. आता आम्हाला हनुमान चालीसा म्हणायची आहे त्याला एवढा विरोध का आहे?
उद्धव ठाकरे महाराष्ट्र कोणत्या दिशेने नेत आहेत? आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ऐकून मोठे झालो आहोत. राजकारणात विचारधारा जिवंत ठेवली पाहिजे. बाळासाहेब ठाकरेंनी पदासाठी आपली विचारधारा मरू दिली नाही. बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण करूनच आम्ही हनुमान चालीसा म्हणणार आहोत. हनुमान चालीसाची ताकद, संकटमोचकाची ताकद आमच्या मागे आहे त्यामुळे शिवसैनिक आम्हाला काही करू शकणार नाहीत असंही नवनीत राणा यांनी म्हटलं आहे. मातोश्रीच्या बाहेर आम्ही जाणार आणि त्या ठिकाणी आम्ही हनुमान चालीसा वाचणारच आहे.
ADVERTISEMENT