पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने अक्षय तृतीयेनिमित्त गणपती मंदिरात आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कोव्हिडमुळे साध्या पध्दतीने आंबा महोत्सव करण्यात आला असून दगडूशेठ गणपतीला 1,111हापूस आंब्याची आरास करण्यात आली. तर हा आंब्याचा प्रसाद ससून येथील रुग्णांना वाटप केले जाणार आहे.
ADVERTISEMENT
अक्षय तृतीयेनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हापूस आंब्यांची आरास
आजच पंढरपूरच्या विठ्ठल रूक्मिणी मंदिरालाही हापूस आंब्यांची आरास करण्यात आली. त्याचप्रमाणे पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीलाही हापूस आंब्यांची आरास करण्यात आली आहे. अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. अनेक वर्षांपासून मंदिरांमध्ये हा सण थाटात साजरा करण्यात येतो. मात्र गेल्यावर्षीप्रमाणेच या वर्षीही राज्यावर कोरोनाचं सावट आहे त्यामुळे हा सण साधेपणाने साजरा करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT