कुलभूषण जाधवांचा खटला १ रूपयात लढणारे हरीश साळवे आता शिवसेना बंडखोर आमदारांचे वकील

मुंबई तक

• 09:53 AM • 27 Jun 2022

महाराष्ट्राच्या राजकारणात जो राजकीय भूकंप झाला आहे ती लढाई आता सुप्रीम कोर्टात पोहचली आहे. बंडखोर आमदार विरूद्ध उद्धव ठाकरे असा सामना पाहण्यास मिळतो आहे. या सगळ्यात एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांची बाजू मांडत आहेत ते म्हणजे हरिश साळवे. हरिश साळवे हे नाव कुलभूषण जाधव या खटल्यात सगळ्या जगाला समजलं होतं कारण तो खटला त्यांनी १ […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्राच्या राजकारणात जो राजकीय भूकंप झाला आहे ती लढाई आता सुप्रीम कोर्टात पोहचली आहे. बंडखोर आमदार विरूद्ध उद्धव ठाकरे असा सामना पाहण्यास मिळतो आहे. या सगळ्यात एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांची बाजू मांडत आहेत ते म्हणजे हरिश साळवे. हरिश साळवे हे नाव कुलभूषण जाधव या खटल्यात सगळ्या जगाला समजलं होतं कारण तो खटला त्यांनी १ रूपया घेत लढवला होता. जाणून घेऊ त्याच हरिश साळवेंबाबत.

हे वाचलं का?

Marathi in Supreme Court : जेव्हा जस्टिस चंद्रचूड हरिश साळवेंना म्हणाले ‘जाऊ द्या!’

कोण आहेत हरिश साळवे?

हरिश साळवे यांचाही जन्म महाराष्ट्रातला आहे. भारतातले एक प्रसिद्ध वकील म्हणून त्यांचा लौकिक आहे. कधी सलमान खानचे वकील म्हणून त्यांच्यावर टीका झाली तर कधी कुलभूषण जाधव यांचा खटला आंतरराष्ट्रीय न्यायालयात लढण्यासाठी त्यांनी फक्त एक रूपया मानधन घेतलं म्हणून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षावही झाला आहे. हरिश साळवे यांचे वडील एनकेपी साळवे हे विदर्भातले काँग्रेसचे बडे नेते होते.

विदर्भवादी नेते म्हणून त्यांची ओळख होती. हरिश साळवे यांचं मूळ गाव नागपूर. त्यांनी आधी सीएचं शिक्षण घेतलं त्यानंतर ते वकिली व्यवसायात दाखल झाले. प्रसिद्ध वकील नानी पालखीवाला यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार त्यांनी वकिलीचं शिक्षण सुरू ठेवलं. हरिश साळवे यांच्या कारकिर्दीची सुरूवात 1975 मध्ये झाली. दिलीप कुमार यांचा खटला त्यांनी लढवला होता. वडिलांना ते या खटल्यात मदत करत होते. आता हेच हरिश साळवे हे शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसाठी बाजू मांडत आहेत.

असं म्हटलं जातं की हरिश साळवे याना पियानो वाजवणं, बेंटले कार चालवणं आणि पुस्तकं वाचण्याचा छंद आहे. एवढंच नाही तर त्यांनी नवी गॅझेट्सही वापरण्याचीही आवड आहे. तसंच ते विविध प्रकारचे मोबाइलही वापरतात. एका सुनावणीसाठी हरिश साळवे कमीत कमी ६ ते १० लाख तर जास्तीत जास्त ३० लाख रूपये घेतात.

हरिश साळवे यांनी सुप्रीम कोर्टात व्होडाफोन टॅक्स प्रकरण, रिलायन्स गॅस वाद प्रकरणात मुकेश अंबानीचे वकील, योगगुरू रामदेव यांच्या प्रकरणात दिल्ली पोलिसांची बाजू मांडणारे वकील आहेत. हरिश साळवे हे एकनाथ शिंदे गटाचे वकील झाल्यापासून ट्विटवरही ट्रेंडमध्ये आहेत.

हरिश साळवेंनी शिंदे गटाची बाजू मांडली तर ठाकरे सरकारचा गट पराभूत होईल असं एका ट्विटर युजरने म्हटलं आहे. एवढंच नाही तर काही भाजप समर्थकही हरिश साळवे बंडखोर आमदारांचे वकील असल्याने एकनाथ शिंदे यांचा गट कोर्टात जिंकेल हे म्हटलंय. केस कमकुवत असती तर हरीश साळवे हे शिंदे गटाचे प्रकरण सुप्रीम कोर्टात मांडायला कधीच तयार झाले नसते, असे लोक म्हणत आहेत. न्यायालयात खटला सुरू होण्यापूर्वीच लोक साळवे यांचा वरचष्मा असल्याचे सांगत आहेत.

आमच्या जिवाला धोका! रोज मिळत आहेत धमक्या, शिंदे गटाची सुप्रीम कोर्टात आणखी एक याचिका

महाराष्ट्र विधानसभा सचिवालयाने शनिवारी १६ बंडखोर आमदारांना ‘समन्स’ बजावून बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी करत २७ जूनच्या सायंकाळपर्यंत लेखी उत्तर देण्याची मागणी केली. शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून महाराष्ट्र विधानसभा (पक्षांतराच्या कारणास्तव अपात्रता) नियम, 1986 च्या तरतुदींच्या “मनमानी आणि बेकायदेशीर” वापराला आव्हान दिले.

घटनेच्या कलम ३२ अन्वये या न्यायालयाच्या अधिकारक्षेत्राचा वापर करण्यास आपल्याला बंधनकारक असल्याचे शिंदे म्हणाले. आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी उपसभापतींनी सुरू केलेली प्रक्रिया संविधानाच्या कलम 14 आणि 19(1)(जी) चे पूर्ण उल्लंघन आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. नाना पटोले यांनी फेब्रुवारी 2021 मध्ये राजीनामा दिल्यानंतर सभापतींची जागा रिक्त आहे आणि अपात्रतेच्या याचिकेवर निर्णय घेण्याचा अधिकार अन्य कोणालाही नाही, ज्या अंतर्गत याचिकाकर्त्याला नोटीस बजावण्यात आली आहे, असा युक्तिवाद करण्यात आला आहे.

हरिश साळवे यांनी एकनाथ शिंदे गटाचं वकीलपत्र घेतल्याने एकनाथ शिंदे गटाचा विजय नक्की मानला जातो आहे. हरिश साळवे हे त्यांच्या खास शैलीसाठी ओळखले जातात. तसंच त्यांनी आत्तापर्यंत भाजपशी संबंधित अनेक केसेस लढवल्या आहेत. त्या जिंकल्याही आहेत.

हरीश साळवेंचे वडील एन.के.पी.साळवे हे कॉग्रेसचे नेते होते. हरीश साळवे यांचं नागपूरमध्ये घर आहे आणि धुळ्याशीही त्यांचा संबंध आहे. ते फक्त सुप्रीम कोर्टातच नाही तर वेगवेगळ्या खटल्यांमध्ये हायकोर्टापासून ते आंतरराष्ट्रीय कोर्टापर्यंत सगळ्या ठिकाणी बाजू मांडत असतात.

    follow whatsapp