Mumbai Airport बाबत हर्ष गोयंका यांनी ट्विट केला व्हीडिओ आणि…

मुंबई तक

• 05:57 PM • 18 Jul 2021

Mumbai Airport Celebrating The Takeover by gujrat अशी कॅप्शन लिहून हर्ष गोयंका यांनी तिथे सुरू असलेला एक गरबा व्हीडिओ ट्विट केला. त्यांनी ट्विट केलेल्या या व्हीडिओवर प्रचंड प्रमाणत प्रतिक्रिया येत आहेत. तसंच हा व्हीडिओ व्हायरलही झाला आहे. या व्हीडिओत काही तरूण-तरूणी गुजराती गरबा करताना दिसत आहेत. गरबा हा गुजरातचा पारंपारिक नृत्य प्रकार आहे. मुंबई इंटरनॅशनल […]

Mumbaitak
follow google news

Mumbai Airport Celebrating The Takeover by gujrat अशी कॅप्शन लिहून हर्ष गोयंका यांनी तिथे सुरू असलेला एक गरबा व्हीडिओ ट्विट केला. त्यांनी ट्विट केलेल्या या व्हीडिओवर प्रचंड प्रमाणत प्रतिक्रिया येत आहेत. तसंच हा व्हीडिओ व्हायरलही झाला आहे. या व्हीडिओत काही तरूण-तरूणी गुजराती गरबा करताना दिसत आहेत. गरबा हा गुजरातचा पारंपारिक नृत्य प्रकार आहे. मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट व्यवस्थापनाचा ताबा 13 जुलैला अदानी समूहाकडे देण्यात आला आहे. अशात RPG इंटरप्रायझेसचे चेअरमन हर्ष गोयंका यांनी हा व्हीडिओ ट्विट केला आहे. हा व्हीडिओ व्हायरल झाला आहे तसंच विविध संमिश्र प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत.

हे वाचलं का?

हर्ष गोयंकांनी ट्विट केलेल्या या व्हीडिओवर 700 हून जास्त लोकांनी रिप्लाय केले आहेत. अनुज म्हात्रे नावाचा एक युजर म्हणतो चला आपल्या देशाचंच नाव बदलून गुजरात ठेवू.. समीर शिंगोटे नावाचा एक युजर म्हणतो भीक म्हणून दिलं आहे तुम्हाला कारण तुमचे पोट नीट भरत नाही तुमच्या राज्यात. त्यामुळे तुम्ही महाराष्ट्रात येता, गप्प बसा पैसे कमवा आणि निघा हक्क नका दाखवू नाहीतर माज उतरवला जाईल. हितेश साळवी नावाचा युजर म्हणतो इतका माज कुठून येतो तुमच्यात? आमच्या 107 हुतात्म्यांनी रक्त सांडलंय, जवळजवळ 60 कोटी रूपये देऊनही तुमचा मत्सर कमी होत नसेल तर अशा प्रवृत्तीला सडेतोड उत्तर देण्यात येईल. आणखी एक युजर म्हणतो महाराष्ट्राचे विमानतळ अदानी समूहाकाडे गेले म्हणजे ते गुजरातमधे गेलेले नाही. हे चालू आहे ते नृत्य कशाचे द्योतक आहे? महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी यावर तीव्र आक्षेप घेणं आवश्यक आहे. योगेश देशमुख नावाचा युजर म्हणतो एखादी नोटीस जाईल का त्यांना? सामाजिक तेढ निर्माण केली जाते आहे आणि मराठी माणसाच्या भावना भडवकवण्याची भाषा करत आहेत.

काय आहे प्रकरण?

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापनाचा ताबा जीव्हीके कंपनीकडून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापनाचा ताबा आता जीव्हीके कंपनीकडून अदानी समूहाने घेतला आहे. याबाबतचं निवेदन कंपनीने प्रसिद्ध केलं आहे. जीव्हीके आणि अदानीमधील कराराला भारतीय विमानतळ प्राधिकरणाने हिरवा कंदिल दिला होता. इतर खात्यांकडून अद्याप यासाठी मंजुरी मिळणं बाकी होतं. आता त्याला मंजुरी मिळाल्याने व्यवस्थापनाचा ताबा घेण्यात आला. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये अदानी समूहाने जीव्हीके ग्रुपसोबत करार केला होता. त्यानुसार जीव्हीकेच्या नावे 50.5 टक्के वाटा अदानी समूहाच्या नावे करण्यात येण्याचं निश्चित झालं होतं. त्याप्रमाणे कंपनीने मुंबई विमानतळामध्ये वाटा असणाऱ्या दोन दक्षिण अफ्रिकन कंपन्यांशी करार करून त्यांच्याकडी 23.5 टक्के आपल्या नावावार करण्याचा करार केला होता.

आता याबाबतच हर्ष गोयंका यांनी जो गुजराती नाच एअरपोर्टवर सुरू आहे त्याचा व्हीडिओ आणि एक कॅप्शन पोस्ट केली आहे. ज्यावरून त्यांच्या या व्हीडिओबाबत संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

    follow whatsapp