ADVERTISEMENT
भारतातील प्रत्येक कानकोपऱ्यात होळीचा उत्सव अगदी जल्लोषात आणि धुमधडाक्यात साजरा केला जातो.
सर्वसामान्यांपासून ते दिग्गज कलाकारांपर्यंत सर्वजण मोठ्या थाटामाटात होळी साजरी करताना दिसतात.
होळी हा देशातील सर्वात मोठा सण आहे. या दिवशी सेलिब्रिटी जवळच्या लोकांसोबत अनोख्या अंदाजात होळी खेळतात.
यावेळी अनेक सेलिब्रिटी त्यांच्या पार्टनरसोबत रोमँटिक होताना दिसले. त्यांचे फोटो-व्हिडीओ आता व्हायरल झाले आहेत.
अभिनेत्री प्रियांका चोप्रा लग्नानंतर परदेशात राहते तरीही ती पतीसोबत होळी एन्जॉय करताना दिसली.
प्रियांकाने दणक्यात होळी साजरी केली. यावेळी दोघांचा किस करतानाचा रोमँटिक फोटो व्हायरल झाला आहे.
मीडियासमोर शाहिद कपूर आणि मीरा राजपूत नेहमीच एकमेकांवर प्रेम करण्याची संधी सोडत नाहीत.
यादिवशीही शाहिद आणि मीरा होळीच्या रंगात रोमँटिक होत किस करताना दिसले.
करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश हे बी-टाऊनचे सर्वात हॉट कपल आहेत. दोघांचे हे रोमँटिक सिझलिंग फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.
सनी लिओन सुद्धा पती आणि मुलांसोबत दरवर्षी मोठ्या थाटामाटात होळी साजरी करते. ती सुद्धा तिच्या पतीसोबत रोमँटिक होताना दिसली.
टीव्ही अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीच्या लग्नानंतरची ही पहिली होळी आहे. तिचाही पतीसोबतचा रोमँटिक व्हिडीओ व्हायरल झाला.
ADVERTISEMENT