ज्या आरोग्य विभागाच्या परीक्षांवरून घोळ झाला होता ऐनवेळी त्या परीक्षांची तारीख आता जाहीर झाली आहे. क विभागाची परीक्षा 24 तारखेला आणि ड विभागाची परीक्षा 31 ऑक्टोबरला होणार आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी याबाबत ही माहिती दिली आहे. न्यासा या संस्थेने या परीक्षेची तारीख जाहीर केली होती.
ADVERTISEMENT
परीक्षा पुढे ढकलण्याचं काय सांगितलं गेलं कारण?
राज्याच्या आरोग्य विभागाने सरळ सेवा भरती प्रक्रियेची जबाबदारी न्यासा या संस्थेवर सोपवलेली आहे. या संस्थेमार्फत गट क आणि गट ड प्रवर्गातील विविध पदांसाठी परीक्षा घेतली जाणार होती. २५ व २६ सप्टेंबर रोजी ही परीक्षा होणार होती.
दरम्यान, एक दिवस आधीच परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला. यामुळे परीक्षार्थींची प्रचंड हेळसांड झाली होती. न्यासा संस्थेनं परीक्षा घेण्यास असमर्थता दर्शवल्याने परीक्षा स्थगित करत असल्याचं सरकारनं म्हटलं होतं. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला होता. मात्र आता राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन या परीक्षा 24 ऑक्टोबर आणि 31 ऑक्टोबरला होणार असल्याचं म्हटलं आहे.
विद्यार्थ्यांनी काय म्हटलं?
या सरकारने परीक्षा रद्द करून गोंधळ घातला आहे. आमच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचं काम इथल्या आरोग्य विभागाने केलं आहे. रातोरात परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या निर्णयामुळे सगळे विद्यार्थी गोंधळात आणि संभ्रमात आहेत. मागच्या वेळी जी कंपनी ब्लॅकलिस्टेड होती त्याच न्यासा कंपनीला पुन्हा परीक्षा घेण्याचं कंत्राट सरकारने का दिलं आणि ते लक्षात आल्यानंतर परीक्षा एकाएकी रद्द का केल्या असाही प्रश्न विद्यार्थी विचारत आहेत.
Maharashtra Arogya Vibhag Admit Card 2021 : आरोग्य विभाग भरती प्रवेशपत्र जाहीर
विद्यार्थिनी निकीता शेंडे म्हणाली, आरोग्य विभागाने ज्या परीक्षा रद्द केल्या त्या ऐकून आम्ही संभ्रमात आहोत. आम्हाला सरकारच्या एकाएकी घेतलेल्या निर्णयामुळे मनस्ताप होतो आहे. परीक्षा देण्यासाठी फॉर्म भरण्यापासून ते हॉल तिकिट काढेपर्यंत प्रॉब्लेमच येत आहेत. मागच्या दोन वर्षांपासून परीक्षा झालेली नाही. आता यावेळी होणार होती ती रद्द केली. घरातले लोक आम्हाला किती दिवस अभ्यास करू देणार? असाही प्रश्न निकीताने उपस्थित केला आहे.
ADVERTISEMENT