साताऱ्याला पावसाने झोडपलं, सखल भागात पाणी, अनेक रस्ते गेले वाहून

मुंबई तक

• 10:56 AM • 18 Jun 2021

सातारा जिल्ह्याला गेल्या काही दिवसांत पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. सातारा शहरासह ग्रामीण भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे, ज्यामुळे अनेक भाग जलमय झाले आहेत. साताऱ्यात शुक्रवारी सकाळी १० वाजेपर्यंत २८.७ मि.मी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात आतापर्यंत १८८ मि.मी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे ग्रामीण भागातली अनेक झाडं कोसळून अशा पद्धतीने रस्त्यावर कोसळली आहेत. […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

सातारा जिल्ह्याला गेल्या काही दिवसांत पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. सातारा शहरासह ग्रामीण भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे, ज्यामुळे अनेक भाग जलमय झाले आहेत.

साताऱ्यात शुक्रवारी सकाळी १० वाजेपर्यंत २८.७ मि.मी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात आतापर्यंत १८८ मि.मी पावसाची नोंद झाली आहे.

या पावसामुळे ग्रामीण भागातली अनेक झाडं कोसळून अशा पद्धतीने रस्त्यावर कोसळली आहेत. ज्यामुळे वाहतूकीचा मार्ग बंद झाला आहे.

पावसाचा हा जोर कायम असल्यामुळे अनेक ग्रामीण भागात नागरी वस्तीत घरांमध्ये पाणी भरलं आहे.

सातारा, जावळी, पाटण, कराड, फलटण, कोरेगाव, माण-खटाव, महाबळेश्वर या सर्व भागांत पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे.

जिल्ह्यात पावसाची संततधार कायम राहिल्यामुळे सर्व नदी, नाले, ओढे दुधडी भरुन वाहत आहेत.

साताऱ्यात अनेक भागांमध्ये रस्त्यांची दैना झालेली असून पावसाची संततधार कायम राहिल्यास जिल्ह्यातली परिस्थिती बिकट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

    follow whatsapp