महाबळेश्वर-सातारा भागात मुसळधार पाऊस, मांडवे गावात ढगफुटी सदृष्य परिस्थिती

मुंबई तक

• 01:53 AM • 06 Jun 2021

सातारा शहरासह महाबळेश्वर, पाचगणी, वाई, जावळी, कराड या भागात शनिवारी संध्याकाळी मुसळधार पाऊस झाला. बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मांडवे येथे ढगफुटीसदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती. अचानक आलेल्या पावसामुळे गावातील ओढे, नाल्यांना पुर आला, त्यातच सर्व विहीरीही भरुन वहायला लागल्यामुळे गावातल्या सर्व रस्त्यावर पाण्याचं साम्राज्य पहायला मिळालं. दरम्यान या पावसामुळे आलेल्या पुरात रानात गेलेल्या ७० वर्षीय […]

Mumbaitak
follow google news

सातारा शहरासह महाबळेश्वर, पाचगणी, वाई, जावळी, कराड या भागात शनिवारी संध्याकाळी मुसळधार पाऊस झाला. बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मांडवे येथे ढगफुटीसदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती. अचानक आलेल्या पावसामुळे गावातील ओढे, नाल्यांना पुर आला, त्यातच सर्व विहीरीही भरुन वहायला लागल्यामुळे गावातल्या सर्व रस्त्यावर पाण्याचं साम्राज्य पहायला मिळालं.

हे वाचलं का?

दरम्यान या पावसामुळे आलेल्या पुरात रानात गेलेल्या ७० वर्षीय महिला पुतळाबाई माने या वाहून गेल्या आहेत. जनावरांना चरण्यासाठी पुतळाबाई रानात गेल्या होत्या. अखेरीस पावसाचा जोर ओसरल्यानंतर स्थानिक आमदार शिवेंद्रराजे यांच्या रेस्क्यू टीमने पुतळाबाईंचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. दुसरीकडे पुसेगाव येथील वर्धनगड घाटातही जोरदार पाऊस झाल्याचं चित्र पहायला मिळालं.

या पावसामुळे सातारा तालुक्यात अनेक घरांचं मोठं नुकसान झालेलं पहायला मिळालं. गेल्या काही दिवसांपासून साताऱ्यातील कास पठार, महाबळेश्वर, पाचगणी, वाई या भागात अशाच पद्धतीने मुसळधार पाऊस सुरु आहे.

    follow whatsapp