एकीकडे कोल्हापुरात पावसाने धुमाकूळ घातलेला असताना सातारा जिल्ह्यालाही पावसाचा फटका बसला आहे. बुधवारी संध्याकाळी सात वाजल्यापासून गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यातील अनेक महत्वाच्या ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली. कराड तालुक्याला या पावसाचा जोरदार फटका बसला असून संपूर्ण तालुक्यात सरासरी ८८.७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
ADVERTISEMENT
कोल्हापूर : धरण क्षेत्रात अतिवृष्टी, पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ
कराडमधील सुपनी, कोपर्डे हवेली मंडल या भागात तर पावसाने जवळपास शतक गाठलं. गुरुवारी सकाळी आठ वाजल्यानंतरही पावसाची संततधार कायम राहिल्यामुळे अनेक गावांमधली जनजीवन विस्कळीत झालेलं पहायला मिळालं. कराड, मलकापूर, सैदापूर, उंब्रज, शेणोली, उंडाळे, काले, सुपने या सर्व भागांमध्ये ८५ ते ९९ मि.मी. च्या घरात पावसाची नोंद झाली.
या पावसाचं पाणी पुणे-बंगळुरु महामार्गावर आल्यामुळे काहीकाळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास निर्माण होऊ शकणाऱ्या धोकादायक परिस्थितीचा आढावा घेत जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
ADVERTISEMENT