रायगड जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली असून आज सकाळपासून जिल्ह्यातील अनेक भागात पावसाची संततदार सुरु आहे. १० आणि ११ जून या दोन दिवशी रायगडात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून या दोन दिवसांमध्ये जिल्ह्यात १२ ते २० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे दोन रायगड जिल्ह्यासाठी धोकादायक असून सर्व नागरिकांनी सतर्क राहण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिले आहेत.
ADVERTISEMENT
रायगड जिल्ह्यातील महाड, पोलादपूर, रोहा, म्हसळा, माणगाव, पनवेल, खालापूर, कर्जत, सुधागड, श्रीवर्धन, तळा या तालुक्यांमधील गावांमध्ये दरड कोसळण्याची भीती आहे. दरड क्षेत्रात येणाऱ्या १०३ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून या गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान अतिवृष्टीच्या काळात कोणीही समुद्रात जाऊ नये असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.
किनारपट्टी भागात असलेल्या गावांमध्ये संभाव्य पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणांना तयार राहण्याचे आदेश देण्यात आले असून गरज पडल्यास नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची तयारी करण्याचेही आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. मुसळधार पावसाच नागरिकांनी शक्य तो घराबाहेर पडणं टाळावं असं आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT