वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाच्या सरी, पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्याची हजारो पोती भिजली

मुंबई तक

• 07:06 AM • 28 May 2021

पुणे: पुणे (Pune) जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यात शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने (Rain) छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या (sugar factory) साखर पोती भिजली आहेत. या भागात गुरुवार सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसाने अनेक झाडे उन्मळून पडले आहेत. तसेच छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या आवारात ठेवलेली साखर पोती देखील भिजली. दरम्यान, यावेळी काही प्रमाणात […]

Mumbaitak
follow google news

पुणे: पुणे (Pune) जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यात शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने (Rain) छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या (sugar factory) साखर पोती भिजली आहेत. या भागात गुरुवार सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसाने अनेक झाडे उन्मळून पडले आहेत. तसेच छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या आवारात ठेवलेली साखर पोती देखील भिजली.

हे वाचलं का?

दरम्यान, यावेळी काही प्रमाणात कच्ची साखर देखील भिजली आहे. जवळपास 20 हजार क्विंटल होऊन अधिक साखर पोती भिजल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या हंगामात छत्रपती सहकारी साखर कारखान्याने जास्त साखर पोत्यांचे उत्पादन केले आहेत. ही साखर ठेवण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपाची गोडाऊन उभारली आहेत.

Mumbai Rains: मुंबईतील पावसाचा धडकी भरवणारा VIDEO, तौकताई चक्रीवादळाचा प्रकोप

वादळी वाऱ्यामुळे या तात्पुरत्या गोडाऊनवरील ताडपत्री उडाल्याने साखर पोती भिजली असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन प्रशांत काटे यांनी दिली.

महाराष्ट्रात 11 जिल्ह्यांमध्ये पावसाच्या जोरदार सरी

दरम्यान, यास वादळामुळे वातावरणात मोठा बदल झाला असून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस बरसत आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांमध्ये देखील सोसट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाच्या सरी बरसण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. यावेळी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबई, ठाणे, पुणे, नवी मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नांदेड, अकोला, लातूर इथे पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. दरम्यान, काल (27 मे) पुण्यासह काही भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरीही लावली आहे.

राजा कायम राहणार पण देशावर महामारी आणि आर्थिक संकट, वाचा काय आहे यंदाची भेंडवळची भविष्यवाणी

मान्सूनसाठीची आवश्यक प्रक्रिया बंगालच्या उपसागरामध्ये सुरू असल्याने यास वादळामुळे मान्सूनवर काही परिणाम होईल का असा प्रश्न सातत्याने विचारण्यात येत होता. यावर आयएमडीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ आर.के. जेनमणी यांनी इंडिया टुडेला प्रतिक्रिया दिली होती. त्यात त्यांनी ‘बंगालच्या उपसागरामध्ये मान्सूनच्या ज्या हालचाली सुरू आहेत त्याच्यावर या वादळाचा फार परिणाम होणार नसल्याची माहिती दिली. तसंच जर काही परिणाम झाला तर मान्सून काही दिवस आधीच भारतात येऊ शकेल.’ अशी माहिती दिली होती. याआधी मान्सून केरळमध्ये 31 मे रोजी दाखल होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता.

महाराष्ट्रात या वादळादरम्यान फारसा परिणाम होणार नसल्याचं म्हटलं होतं. मात्र राज्यात वादळामुळे काही ठिकाणी आणि किनारपट्टी प्रदेशात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच, मुंबईतलं वातावरण ढगाळ असेल अशी माहिती हवामान खात्यातील अधिकारी शुभांगी भूते यांनी दिली होती.

दरम्यान, यंदा भारतात मान्सून वेळेत पोहचणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. तसंच समाधानकारक पाऊस होण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.

    follow whatsapp